शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारपासून शहरात चार वाढीव लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST

जळगाव : कोराेना प्रतिबंधक लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने जळगाव शहरात चार शासकीय लसीकरण केंद्र मंगळवार, ११ मे ...

जळगाव : कोराेना प्रतिबंधक लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने जळगाव शहरात चार शासकीय लसीकरण केंद्र मंगळवार, ११ मे पासून सुरू करण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय कोविड टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांच्यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

चार नवीन केंद्र

१) जळगाव शहरात ११ मे पासून गणपती नगरातील स्वाध्याय भवन, मेहरूण परिसरात मुलतानी हॉस्पिटल या ठिकाणी १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

२) शनिपेठ येथील शाहीर अमर शेख दवाखाना, निमखेडी रस्त्यावरील कांताई नेत्रालय या ठिकाणी ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना कोविड लसीकरणासाठी कोविन पोर्टल, आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करणे व त्यानंतर वेळेसंबंधी व केंद्र संबंधित नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. केवळ नोंदणी करून व वेळेची नोंदणी न करता केंद्रावर प्रवेश मिळणार नाही, याविषयीदेखील पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.

४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटासाठी ९ मे व १० मे या दोन दिवसात कोविशिल्डचा दुसरा डोस प्राधान्याने देण्यात येणार आहे. मंगळवार, ११ मे पासून कोविशिल्डचा दुसरा डोस व पहिल्या डोसचे अनुक्रमे ७०/ ३० असे प्रमाण राहणार आहे.

४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटाचे लसीकरण होत असलेल्या केंद्रावर उभ्या असलेल्या नागरिकांना उपलब्ध लसीइतके कुपन देण्यात येतील. त्याबाबत नोंद वहीत नोंदणी घेण्यात येऊन कुपन वाटपाचे दूरचित्रीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरणाचे या पद्धतीने नियोजन राहणार असून, सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.