शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अंजिठा घाटात सळईने भरलेला ट्रक उलटल्याने चार तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 13:38 IST

प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल, वाहनांच्या रांगा लागल्या

ठळक मुद्देवाहनांच्या लांबलचक रांगाप्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हालदुपारी १ वाजेपर्यंत वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न

आॅनलाइन लोकमतवाकोद, जि. जळगाव, दि. २५-   जळगाव औरंगाबाद महामार्ग क्रमांक  १८६ व अंजिठा घाटात सकाळी ९ वाजेच्या सुमारास सळई ने भरलेला ट्रक पलटी झाल्याने सुमारे चार ते पाच तास दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातामुळे वाकोद ते अजिंठा सुमारे १० किलोमीटर पर्यंत वाहतूक पूर्णत: ठप्प झालेली होती. वाहतूक सुरळीत करतांना अजिंठा व फर्दापूर पोलिसासह वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक उडाली होती.  या ट्रॅफीकमुळे हजारो वाहनांची रेलचेल थांबली होती. परिवहन मंडळाच्या अनेक बसेस अडकल्यामुळे प्रवाश्याचे प्रचंड हाल झाले.उन्हाची दाहकता सोसवेना :  उंच टेकडी वर असलेल्या घाटामध्ये दुपारच्या प्रहरी कडकडत्या उन्हाच्या तीव्रतेच्या दाहकतने प्रवाशांचे प्रचंड  हाल झाले. काहींनी वाहनच्या बाहेर पडून झाडाच्या सावलीचा आधार घेताना दिसत होते.  लहान बालकांचे उन्हामुळे प्रचंड हाल झाले.अपघात ठिकाणी जे. सी.बी. व पोकलँड तसेच क्रेनच्या साह्याने लांब लचक असलेल्या वाहनांचे दोन भाग करून  त्यातील सळई रसत्याच्या बाजूला केल्यानंतर हळूहळू  वाहतूक सुरळीत करण्यात आली.  दुपारी १ वाजेपर्यंत वाहतूक सावरण्याचे काम सुरु होते .पिकअपसाठी दुचाकींची मोठी वर्दळ : अजिंठा ते फर्दापूर  पर्यत संपूर्ण घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहने बराच वेळ थांबुन असल्याने जवळपासचे नातवाईक, मित्र कंपनीला या वर्दळीतून  निघण्यासाठी बोलविले  होते.  या ट्रॅफीकमध्ये   दुचाकी शिवाय कोणताच पर्याय नसल्यानेमोटर सायकलींची मोठी वर्दळ होती.  विदेशी पर्यटकांना ही फटका : येथे जग प्रसिद्ध अजिंठा लेणी तसेच या औरंगाबाद ऐतिहासिक जिल्हा असल्याने येथे दररोज देशी विदेशी पर्यटकांची ये जा असते. या वाहतुक कोंडीचा  फटका देखील विदेशी पर्यटकांना बसला.औरंगाबाद येथे इज्तेमाला जाणाºया  मुस्लिम बांधवांची  वाहने या ट्रॅफीकमध्ये अडकल्याने देखील मोठे हाल झाले.तसेच लग्नाची मोठी तिथी असल्याने त्याचे देखील या ठिकाणी हाल झाल्याचे दिसून आले.