शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पित्याच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी सरसावल्या चारही मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:29 IST

जन्मदात्याची इच्छा पूर्ण

जामनेर / वाकोद : पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांना मुलींपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. मात्र ती बाब आता काळाच्या ओघात हळूहळू लोप होत चालली आहे. याचाच प्रत्यय जामनेर येथे येऊन मुलींनी आपल्या पार्थिवाला खांदा देत एक आदर्श समाजा पुढे ठेवला आहे.जामनेर येथील प्रतिष्ठित व्यापारी व नवजीवन प्रोव्हिजनचे संचालक राजकुमार राणुलाल बोहरा (४९) यांचे २९ रोजी संध्या. ६.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. तत्पूर्वी त्यांना जैन धर्मा नुसार संथारा व्रत धारण करण्यात आले होते. त्यांची अंत्ययात्रा शनिवार ३० रोजी सकाळी १० वाजता आनंद नगर येथून त्यांच्या राहत्या घरून निघाली. राजकुमार बोहरा यांना चार मुली व एक मुलगा असल्याने त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी चारही मुली पुढे सरसावल्या. यातील एक मुलगी विवाहित असून तीन मुली अविवाहित आहे तर मुलाचे वय १४ वर्ष आहे. नेहा, प्रिया, यशस्वी, तेजस्वी यांनी दु:खात स्वत:ला सावरून पित्याच्या पार्थिवाला खांदा दिला. या निर्णयाचे सगळ्यांनी बळ देत राजकुमार बोहरा यांची अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली.चार मुलींच्या जन्मदात्या बापाला त्याच मुलींनी खांदा देत वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केल्याचा अनुभव या ठिकाणी आला. जामनेर येथे मुलीच्या खांद्यावरून निघालेली कदाचित ही पहिलीच अंत्ययात्रा नव्या युगाची नांदी ठरली आहे. राजकुमार बोहरा यांच्या वाट्याला मुलींच्या खांद्याचे भाग्य लाभले, असा सूर या वेळी ऐकवयास मिळाला. वडिलांच्या निधनानंतर सामाजिक प्रथेची कुठलीही तमा न बाळगता खांदा देण्याचे कार्य मुलींनी पार पाडले. येथील या अभूतपूर्व घटनेचे साक्षीदार ठरलेल्या नागरिकांनी या घटनेची प्रशंसा केली आहे. मुलींनी आपल्या कृतीतून समाजासमोर नवा आदर्श स्थापित केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राजकुमार बोहरा यांच्या अवघ्या वयाच्या ४९ व्या वर्षी अकाली निधनाने दीर्घ आयुष्य लाभलेल्या आई व पित्याला अश्रूंचा बांध फुटला होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव