जळगाव : मनपा प्रशासनाची दिशाभूल करणे तसेच महासभेत बोलविल्यानंतरही त्याठिकाणी उपस्थित न राहता कामात कसूर केल्याप्रकरणी मनपाच्या नगररचना विभागातील चार अभियंत्यांना आयुक्त संजय कापडणीस यांनी निलंबित केले आहे. निलंबित झालेल्या अभियंत्यांमध्ये साहाय्यक नगर रचनाकार अरविंद भोसले, सहाय्यक गोपाल घुले, सतीश परदेशी, संजय पाटील यांचा समावेश आहे. मनपा नगररचना विभागातील सहा अभियंत्यांनी महासभेच्या ठरावाविरुद्ध दिलेल्या पत्रामुळे सहा अभियंत्यांना निलंबित करून चौकशी करण्याचा ठराव झाला होता. या कारवाईस विलंब होत असल्यामुळे काही नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली होती. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी भेटीदरम्यान केली होती. त्यानुसार चार अभियंत्यांना चौकशी करून आयुक्तांनी निलंबित केले आहे. दोघा अभियंत्यांना दिलासा निलंबित झालेल्या चार अभियंत्यासह नरेंद्र जावळे व योगेश वाणी यांनाही निलंबित करण्याचा ठराव होता. मात्र, जावळे व वाणी यांच्या रेकॉर्डची चौकशी करून त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. आयुक्त कापडणीस यांनी मंगळवारी उशिरा चार अभियंत्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. विभागीय चौकशी होणार निलंबित अभियंत्यांची विभागीय चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चार अभियंते निलंबित
By admin | Updated: October 14, 2015 00:14 IST