शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

जि.प.सह चार विभागाची ‘एनओसी’!

By admin | Updated: October 31, 2015 00:12 IST

धुळे : महापालिकेच्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सततच्या पाठपुराव्यानंतर लघुपाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद आणि भूमि अभिलेख या चार विभागाने ना हरकत दाखला दिला आहे.

धुळे : महापालिकेच्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आह़े सततच्या पाठपुराव्यानंतर लघुपाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद आणि भूमि अभिलेख या चार विभागाने एनओसी अर्थात ना हरकत दाखला दिला आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. दरम्यान, रखडलेल्या प्रकल्पाच्या कामाला आता काहीअंशी चालना मिळाली़ प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी यंत्रणेने आता तातडीने पाऊल उचलण्याची गरज व्यक्त होत आह़े

जकात व पारगमन शुल्क बंद झाल्याने महापालिकेचे 69 कोटींचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. त्याचा परिणाम विकासकामांसह कर्मचारी वेतनावर झाला आह़े दैनंदिन खर्च पाहता आणि उत्पन्न तुटपुंजे असल्याने महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी चिंतेत आह़े एलबीटीवर महापालिकेची मदार होती़ ती पण आता बंद झाली आह़े जे काही आहे ते आता मालमत्ता कराच्या वसुलीवर अवलंबून आह़े त्यातून काहीसा दिलासा मिळणार असलातरी हा प्रश्न सुटणार नाही, अशी स्थिती आह़े

तापी व अन्य जलस्त्रोतांतील पाणीपुरवठा योजनेचे वार्षिक 14 कोटींचे वीज बिल भरणे शक्य होणार आह़े याशिवाय अक्कलपाडा ते नकाणे तलाव पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे, ती पूर्ण झाली तर 60 लाखांच्या निधीची बचत होऊ शकेल़ त्याचप्रमाणे पवन ऊर्जा प्रकल्प मार्गी लागला तर वीज बिलात दरमहा 40 लाख रुपयांची बचत होऊ शकेल असा विश्वास महापालिका प्रशासनाला आह़े

कामातील उदासीनता

गेल्या दोन वर्षापासून केवळ कागदोपत्री पाठपुरावा अगदी नावाला सुरू असल्याचे चित्र आह़े अद्यापर्पयत ठोस कोणतेही पाऊल याबाबत उचलण्यात आलेले नाही़ पवन ऊर्जा प्रकल्पाबाबतचा संपूर्ण अहवाल तयार होणे गरजेचे आह़े प्रकल्प पूर्ण होत असताना एकत्रित किती खर्च अपेक्षित आहे, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरूच आह़े या प्रकल्पासाठी उद्योग आणि ऊर्जा विभागाची मान्यता गरजेची आह़े त्यासाठीही पाठपुरावा होत आह़े जागेचा मोजणी नकाशा असायला हवा़ ज्याठिकाणी हा प्रकल्प उभारला जाणार आहे, त्या जागेवर पोहोच रस्ता उपलब्ध करून द्यायला हवा़ उच्च वीज वाहिनीजवळ रस्ता झाला पाहिजे, यदाकदाचित तो नसल्यास रस्ता तातडीने करून द्यायला हवा़ या अनुषंगाने निर्माण होणा:या विविध बाबींवर वेळीच प्रकाशझोत टाकायला हवा़ पण, याबाबतीत केवळ उदासीनता असल्याचे म्हणावे लागेल़ पूर्ततेसाठी मनपाला दोन वर्षाचा काळ लागला यावरून उदासीनता जाणवत आह़े

प्रकल्प आठ कोटींचा

महापालिकेचा पवन ऊर्जा प्रकल्प हा सुमारे 8 कोटींचा आह़े त्यातून 4 मेगाव्ॉट वीजनिर्मिती होऊ शकेल़ हा प्रकल्प साक्री तालुक्यातील टिटाणे शिवारात प्रस्तावित आह़े त्यासाठी एकत्रित 4 एकर जागा लागणार आह़े ती हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी महसूल विभागाने काढल्या होत्या़ त्याची पूर्तता करण्याचे महापालिकेला सूचित करण्यात आले होत़े त्यासाठी प्रशासनाला बरीच कसरत करावी लागत आह़े लोकप्रतिनिधी आणि अधिका:यांनी समन्वयाने प्रयत्न केले तर त्याचा लाभ पर्यायाने महापालिकेला होणार आह़े