जळगाव : गांजाची केस दाखल न करण्यासाठी ८ हजाराची लाच स्विकारणारे सहायक फौजदार बापुराव फकिरा भोसले (५२,रा.चाळीसगाव, मुळ रा.आमडदे, ता.भडगाव) व कॉन्स्टेबल गोपाल गोरख बेलदार(३१, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर ह.मु.चाळीसगाव) या दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. भोसले व बेलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री चाळीसगाव येथे ८ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. उपअधीक्षक गोपाल ठाकूर यांच्या पथकाने रविवारी त्यांना जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ मे पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.
लाचखोर पोलिसांना चार दिवस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 13:25 IST