नंदुरबार : गवळीवाडा भागात चार बालकांना डेंग्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर धुळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिनाभरापूर्वी शाहदुल्लानगर भागातील बालिकेला डेंग्यू झाला होता. आता गवळीवाडय़ातील चौघांना लागण झाली आहे. ध्रुव काशिनाथ गवळी (सात वर्ष), अक्षरा सुशील गवळी (नऊ वर्ष), नंदिनी पिंटू ठाकूर (12 वर्ष) व मित भरत कुंभार (साडेचार वर्ष) अशी रुग्णांची नावे आहेत.
चार बालकांना डेंग्यू!
By admin | Updated: December 10, 2015 00:09 IST