शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चार जळगावकर आहेत गुणवंत क्रीडा संघटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:30 IST

संघटक चार तर खेळाडू सात

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्याशी संबंधीत एकूण ११ जणांना सन्मान

ललित झांबरे /आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १३ - जिल्ह्यातील दोन क्रीडा संघटकांना एकाचवेळी राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याने जळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाची लहर आहे. डॉ.प्रदीप तळवेलकर आणि फारूक शेख यांना हा पुरस्कार मिळणे जवळपास निश्चित असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळात होती. त्यावर सोमवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले.जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून आता सहा जणांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय आणखी पाच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा जळगावशी संबंध आहे. याप्रकारे जिल्ह्याशी संबंधीत आतापर्यंत एकूण ११ जणांना हा पुरस्कार मिळाला आहे.डॉ.तळवेलकर आणि शेख यांच्यासह जळगाव जिल्ह्यात आता चार शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक आहेत. त्यात अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे प्रा.डॉ. नारायण खडके (२००५-०६) आणि खो-खो संघटनेचे गणपतराव पोळ (२००४-०५) यांचाही समावेश आहे.जिल्ह्यातील पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते म्हणून भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविलेले शूटींगबॉलपटू अशोक चौधरी यांची नोंद आहे. त्यांना १९९५-९६ साठी खेळाडू म्हणून हा पुरस्कार मिळाला होता हे विशेष. त्यानंतर जळगाव जिल्ह्याला खेळाडू म्हणून राज्य पुरस्कार दिव्यांग जलतरणपटू कांचन चौधरी (२०१४) हिने एकलव्य पुरस्काराच्या रूपाने मिळवून दिला होता.याशिवाय चाळीसगावचे बॅडमिंटनपटू मिलिंद घाटे, मुळची असोद्याची साहसी क्रीडापटू शीतल महाजन (पुणे) , टेबल टेनिसपटू रोहित चौधरी (पुणे), मुळच्या वर्ध्याच्या आणि रेल्वेच्या व्हॉलीबॉलपटू अंजली रहाणे-पाटील आणि जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या कॅरमपटू आयेशा मोहम्मद (ठाणे) हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते जळगाव जिल्ह्याशी संबंधीत आहेत.जळगाव जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेतेनाव खेळ वर्षमिलिंद घाटे बॅडमिंटन १९८८-८९अंजली रहाणे-पाटील व्हॉलीबॉल १९९३-९४अशोक चौधरी शूटिंगबॉल १९९५-९६रोहित चौधरी टेबल टेनिस २०००-०१आयेशा मोहम्मद कॅरम २००३-०४गणपतराव पोळ क्रीडा संघटक २००४-०५शीतल महाजन साहस २००४-०५प्रा.डॉ.नारायण खडके क्रीडा संघटक २००५-०६कांचन चौधरी जलतरण २०१३-१४फारूक शेख क्रीडा संघटक २०१४-१५डॉ.प्रदीप तळवेलकर क्रीडा संघटक २०१६-१७

टॅग्स :JalgaonजळगावSportsक्रीडा