शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला अ.भा. मराठी विज्ञान परिषदेचे ५३ वे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:22 IST

अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचे तीन दिवसीय अधिवेशन येथे २२ ते २४ दरम्यान होत असून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी आठ वाजता पाटणादेवी मंदिरात उद्घाटन होणार आहे.

ठळक मुद्देराज्यपालांच्या उपस्थितीत शनिवारी उद्घाटनतीन दिवसीय संमेलनात विविध कार्यक्रमडॉ. अनिल काकोडकर मारणार विद्यार्थ्यांशी वैज्ञानिक गप्पा

चाळीसगाव : अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचे तीन दिवसीय अधिवेशन येथे २२ ते २४ दरम्यान होत असून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी आठ वाजता पाटणादेवी मंदिरात उद्घाटन होणार आहे. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी उमविचे माजी कुलगुरु व गणितज्ञ प्रा. एन.के.ठाकरे तर स्वागताध्यक्ष आमदार उन्मेष पाटील असतील. तीन दिवसीय संमेलनात विविध परिसंवादांसह, व्याख्यान, विज्ञान सहल, वैज्ञानिक गप्पा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनात शास्त्रज्ञ, अभ्यासक उपस्थित राहणार आहे. खान्देशात असे अ.भा.स्तरावरील अधिवेशन पहिल्यांदाच होत असल्याने मोठी उत्सुकता आहे.२२ रोजी सकाळी आठ वाजता पाटणादेवी मंदिरात अधिवेशनाच्या उद्घाटन होईल. मंदिर परिसरात यावेळी विज्ञान गीत, मान्यवरांचा परिचय, स्मरणिका प्रकाशन, पुरस्कार वितरण होईल. प्रा. एन.के.ठाकरे अध्यक्षीय भाषण करतील. दुपारच्या सत्रात य.ना.चव्हाण महाविद्यालयात तीन वाजता कापसावरील बोंडअळीचे निर्मूलन या विषयावर नागपुर येथील कॉटन रिसर्चचे प्रभारी संचालक डॉ. व्ही.एन.वाघमारे यांचे व्याख्यान होईल. दुपारी चार वाजता 'महिलांचे आरोग्य' याविषयावरील परिसंवादात डॉ. राजेंद्र आगरकर, डॉ. विनोद कोतकर, डॉ. सुनील राजपुत, डॉ.नियती चितालीया आदी सहभागी होतील. सायंकाळी वातार्लाप आणि रात्री मनोरंजन सोहळा होईल. उपस्थितीचे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे चाळीसगाव विभागाचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, कार्यवाह डी.टी.पाटील, उपाध्यक्ष प्रा.अ.वा.बागड, कोषाध्यक्ष सी.सी.वाणी, प्रा. ल.वि.पाठक, सुधीर पाटील, डॉ. विनोद कोतकर यांनी केले.डॉ. अनिल काकोडकर मारणार विद्यार्थ्यांशी वैज्ञानिक गप्पाअधिवेशनाच्या दुस-या दिवशी २२ रोजी सकाळी नऊ वाजता 'गणित व विज्ञान शिक्षणाच्या नवीन वाटा' या विषयावरील परिसंवादात प्रा.एन.के.ठाकरे, डॉ. विवेक पाटणकर, प्रा. भालचंद्र भणगे, प्रा. श्रीगणेश प्रभू, प्रा. रंजन गर्गे आदी वक्ते मार्गदर्शन करतील. दुपारी 'सर्वांसाठी शाश्वत सौर उर्जा' यावर अभय यावलकर, 'सिलेज' या विषयावर डॉ. अनिल काकोडकर यांचे व्याख्यान होईल.दुपारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे वैज्ञानिक गप्पा मारतील. या गप्पांमध्ये प्रा. ज्येष्ठराज जोशी, प्रा. एन.के.ठाकरे हेही सहाभागी होतील.देशभरातील अभ्यासक सहभागी होणारमराठी विज्ञान परिषदेच्या ५३व्या अधिवेशनात देशभरातील ३०० हून अधिक विज्ञान अभ्यासक सहभागी होणार असून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागण्यासह विज्ञान प्रसारासाठी हे अधिवेशन प्रथमच खान्देशात होत आहे. २०० हून विद्यार्थी देखील सहभागी होतील. अशी माहिती प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.वैज्ञानिक सहलीने सांगताअधिवेशनाची सांगता २४ रोजी वैज्ञानिक सहलीने होणार आहे. सहलीत केकी मुस कलादालन, वेरुळ येथे भेटी दिल्या जातील.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव