शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊ वस्तूंपासून बनविला किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 21:03 IST

मुलांनी केली सुंदर कलाकृती

सावदा ,ता.रावेर : दिवाळी आली म्हणजे सर्वांच्या आनंदाला उधाण येते. चिमुकल्या जीवांना फराळाची, तरुणांना फटाक्यांची व नवीन कपडे घालून मिरवण्याची आवाड असते. तर गृहिणींना फराळ तयार करून सर्वांना खाऊ घालण्याची लगबग असते. लेकीला माहेरची ओढ असते. अशा या दिवाळीत कलावंतांना सुद्धा काहीतरी नवीन करावसं वाटतं. त्याचप्रमाणे ईशान आणि वरद या दोघा मुलांनी दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला बनविण्याचं ठरवल आणि सुंदर कलाकृतीही घडविली.सुरुवातीस मित्रमंडळीच्या बैठकीत किल्ला बनविण्यावर शिक्कामोर्तब झाले. नंदू सरांनी मातीच्या किल्ल्यापेक्षा वेस्टेज वस्तू वापरण्याचा सल्ला दिला. यात कापड, वर्तमानपत्र, बांबू,स्पंज रंगवून डोंगर टेकड्या व पुठ्ठ्याचे बुरुज तसेच दरवाजे केले. तुरखाटीच्या काड्या वापरून जुन्या साडीच्या चिंध्या तसेच वर्तमानपत्र वापरून त्यावर कापडी झेंडे लावून किल्ला तयार झाला. या किल्ल्याच्या अग्रभागी शिवछत्रपती शिवाजी राजे यांची मूर्ती ठेवून शिवाजी महाराज की जय असा जयघोष सुरू झाला. किल्ल्याच्या विविध भागांची चर्चा सुरू झाली. हा बुरुज... हा दरवाजा... हा कडा ...हा महल तसेच भंडारा घर, विहीर, तोफखाना असे शब्द कानावर आले. इतिहास मुलांच्या मनात रहावा हा उद्देश सफल झाला. किल्ला लोकांपर्यंत पोहोचला लोक पाहायला येऊ लागले त्यांच्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.