शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या पुस्तकाचे आज प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 00:18 IST

२ सप्टेंबर रोजी रद्द झालेला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरील  जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १० सप्टेंबर रोजी आॅनलाईन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकाय असेल पुस्तकात, साऱ्यांनाच उत्सुकता‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’मुक्ताईनगरात होणार आॅनलाईन प्रकाशननितीन गडकरी, रावसाहेब दानवेंसह मान्यवरांची हजेरी

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : २ सप्टेंबर रोजी रद्द झालेला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरील  जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुक्ताईनगरात खडसे फार्म हाऊस येथे आॅनलाईन करण्यात येणार आहे.अलीकडे खडसेंनी फडणविसांवर केलेला हल्लाबोल पाहता या पुस्तकाच्या आॅनलाईन प्रकाशनात ठिकठिकाणावरून राज्यातील कोणकोणते नेते सहभागी होतात हे लक्षवेधी ठरणार आहे. या पुस्तकात काय आहे याची उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे खडसेंच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कोणते नेते सहभागी होतात याचीही उत्कंठा आहे तर संघर्षाच्या मूडमध्ये आलेले खडसे पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्ताने काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागून आहे२ सप्टेंबर रोजी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने खडसे यांच्यावरील ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ हे पुस्तक प्रकाशित होणार होते मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवट्यामुळे २ रोजी रद्द करण्यात आला होता. आता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आता गुरुवार, १० रोजी होत आहे. बेधडक वक्ता असलेले खडसे पक्षाअंतर्गत आप्त स्वकयांच्या षङ्यंत्राचे बळी पडले आहेत. अशात खडसे यांच्यावरील पुस्तकात नेमके काय आहे याची उत्सुकता लागून आहे. त्यात ही पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ८ दिवस पुढे लोटला गेल्याने पुस्तकाबाबतची उत्कंठा शिगेला आहे.एकनाथराव खडसे यांच्या बालपणापासून आतापर्यंतचा प्रवास मांडण्यात आलेल्या ‘जनसेवेचा मान बिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे लेखन भुसावळचे प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केले आहे. अथर्व पब्लिकेशनच्या माध्यमातून २१९ पानांचे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. खडसे यांची मुखमंत्री पदाची हुकलेली संधी, त्यांच्यातले अष्टपैलू गुण, स्वच्छंदी कलाकार, आवडी-निवडी, समाजातील मान्यवर पक्षातील नेत्यांच्या, कुटुंबातील सदस्य कार्यकर्ते यांच्या प्रतिक्रियांचा अंतर्भाव यात करण्यात आला असून राजकारणात गॉड फादर या बाबत चे संबोधन यात आहे.नाथाभाऊ यांच्या राजकारणातील प्रवासात अच्छे दिन पासून अलीकडच्या काल खंडातील चक्रव्यूहात अडकलेले नाथाभाऊ या घडामोडीबाबत या पुस्तकात नेमके काय या बाबत लेखकाने अद्याप कोणतेही भाष्य केले नसल्याने उद्या पुस्तकात नेमके काय आहे हे समोर येणार आहे.दरम्यान, खडसेंवर आणखी एक पुस्तक लवकरच येणार आहे. ‘नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान’ असे या पुस्तकाचे शीर्षक आहे. हे पुस्तक केव्हा प्रकाशित होईल याचीदेखील प्रतीक्षा लागून आहे.तीन दिवस हल्लाबोल२ सप्टेंबर रोजी या पुस्तकाच्या निमित्ताने खडसेंनी फडणविसांवर एकामागून एक तीन दिवस हल्ला चढविला होता. खडसे यांनी थेट आडवा येणाऱ्यांना आडवे पडणार असे सांगून संघर्षाची भूमिका स्पष्ट केली आहे, तर माझ्याविरुद्ध षङ्यंत्र करणाºयांचे पुरावे हाती लागले असून, या नवीन पुस्तकात पुराव्यानिशी त्याचा भांडाफोड करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यभरात याची चर्चा रंगली होती. आता खडसे उद्या काय बोलतात याची उत्सुकता आहे.नितीन गडकरी, रावसाहेब दानवेंसह मान्यवरांची हजेरीपुस्तकाचे लेखक डॉ. सुनील नेवे यांनी दिलेल्या माहितीनुसार १० रोजी सकाळी ११ वाजता खडसे यांच्या फार्महाऊसवर आॅनलाईन प्रकाशनाचा मुख्य सोहळा होणार आहे, तर याच वेळेस केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे आपापल्या ठिकाणावरून आॅनलाइन प्रकाशन करणार आहेत. तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडसे फार्म हाऊस येथे खासदार रक्षा खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, बेटी बचावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जि.प.अध्यक्ष रंजना प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे खेवलकर, भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष अशोक कांडेलकर, जि.प. सभापती जयपाल बोदडे यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील नगराध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी एकनाथराव खडसे यांच्या जीवनपटावर ९ मिनिटांची डाक्युमेंट्री फिल्मही दाखविली जाणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर