शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे, माजी महानगर महिला अध्यक्षा अरूणा पाटील निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 12:48 IST

दुकानांच्या वादाचे पडसाद

जळगाव : कॉँग्रेस भवनाच्या आवारातील मोकळ्या जागेतील दुकानांच्या वादावरून सुरू असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे व माजी महानगर महिला अध्यक्षा अरूणा पाटील यांना कॉँग्रेस पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कॉँग्रेस भवनातील दुकानांचा वाद गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे. तब्बल ४० वर्षांपासून अत्यल्प भाड्यावर कॉँग्रेस भवनात कापडे विक्रेत्यांना जागा देण्यात आली आहे. तत्कालीन अध्यक्ष अख्तरअली काझी यांच्या काळात या दुकानांना जागा देण्यात आली आहे. मात्र मनपा अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईनंतर दुकानांना दिलेल्या जागेचा वाद पेटला आहे.जागा भाड्याने नकोही जागा भाड्याने नकोे म्हणून अरूणा पाटील व अन्य काही कार्यकर्त्यांचा विरोध होता. यासाठी त्यांनी भिकमांगो आंदोलनही केले. या आंदोलनामुळे पक्षाची बेअब्रु झाली असा ठपका जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी ठेवला होता त्यानंतर अरूणा पाटील यांची महिला महानगर अध्यक्षपदावरून गच्छंती झाली होती.सरचिटणीस पाटील यांना काळे फासलेपक्षाने केलेल्या कारवाईनंतर शांत न बसता अरूणा पाटील व त्यांच्या समर्थकांनी गेल्याच आठवड्यात कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील यांना मारहाण करत त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर संजय वराडे यांच्यावर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गेल्याच आठवड्यात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. तीन दिवस ते जिल्हा कारागृहात होते.पक्षाकडून गंभीर दखलसंजय वराडे यांचे तालुका अध्यक्षपद यापूर्वीच काढण्यात आले होते. अशीच कारवाई अरूणा पाटील यांच्यावर होऊनही त्यांनी मारहाण व सरचिटणीस अजबराव पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार केल्याने या दोघांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याच्या प्रभारी डॉ. हेमलता पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र कॉँग्रेस जिल्हाध्यक्षांना नुकतेच प्राप्त झाले. ऐन निवडणुकीत दोघा माजी पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे.घडलेल्या घटना, दाखल गुन्हे व पक्षशिस्तीला बाधा आणण्याचा प्रकार केव्हाही खपवून घेतला जाणार नाही. दादागिरी, गुंडगिरीमुळे पक्षात येणाऱ्यांरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गंभीर दखल पक्षाने घेऊन दोघांवर कारवाई केली आहे.- अ‍ॅड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस.

टॅग्स :Jalgaonजळगाव