भुसावळ : शहराचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी हद्दपारच्या नोटीसविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका परत घेतली आहे. त्यावर यासंबंधी कारवाईच्या प्रकरणाची सुनवाई लवकर घेण्याची अपेक्षा उच्च न्यायालयाने प्रशासनाकडून व्यक्त करत तसे निर्देश दिले आहेत.
अनिल चौधरी यांना हद्दपारीची नोटीस प्रशासनाने जाहीर केली आहे व त्यावर कारवाई सुरू झाली आहे. त्यानी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण या याचिकेच्या खुलाशासंदर्भात प्रशासनाने न्यायालयात अहवाल दाखल केला. त्यानंतर चौधरी यांनी ही याचिका परत घेतली व त्यावर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने हद्दपारची कारवाई महाराष्ट्र पोलीस ऍक्ट ५६ व ५९ अन्वये तातडीने पूर्ण करावी व त्यावर लवकर निर्णय घ्यावा तसे कोर्टाला अपेक्षित असल्याचे आदेश दिले. त्यामुळे आता प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे आता अनिल चौधरी यांच्या हद्दपारीच्या कारवाईचे कामकाज प्रशासनाला लवकर चालवावे लागणार असून, त्यावर लवकर निर्णय द्यावा, लागणार आहे. दरम्यान, या वृत्ताला सरकारी वकील सचिन सलगरे यांनी दुजोरा दिला आहे.