शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या नगरात भुंकणाऱ्या कुत्र्याला ठार मारुन माजी नगरसेवकाकडे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:24 IST

निवडणुकीचा पैसा समजून प्रचार साहित्याचे खोके फोडले

जळगाव : निवडणुकीसाठी पैसा आल्याचे समजून चोरट्यांनी खोके फोडले, मात्र त्यात प्रचारसाहित्य निघाल्याने निराश झालेल्या चोरट्यांनी भाजपचे माजी नगरसेवक तथा मंडळ अध्यक्ष प्रदीप रामकृष्ण रोटे यांच्या घरातील कपाट फोडून पाच हजार रुपये लांबविले. तत्पूर्वी गल्लीत भूंकणाºया कुत्र्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीने कुत्र्यालाच ठार मारले. सोमवारी पहाटे पहाटे अयोध्या नगरात ही घटना उघड झाली.भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप रोटे हे पत्नी व दोन मुलांसह आयोध्यानगरातील श्रीरामपार्क जवळ वास्तव्यास आहेत. मुलगा व मुलगी दोन्ही पुण्याला शिकायला असून घरी पती व पत्नी असे दोघे राहतात. महिनाभरापासून पुण्याहून मुलगी घरी आली आहे. दुमजली घर असून खालच्या घरात कपाट, साहित्य ठेवले आहे. साहित्य ठेवण्यासह जेवणासाठी या खोलीचा वापर होतो.कुटुंब वरच्या खोलीत अन् खालच्या घरात चोरीरविवारी रात्री वादळ असल्याने लाईट बंद होती. ११ वाजेपर्यंत सर्व जण जागी होते. यानंतर खालच्या खोलीला कुलूप लावून रोटे कुटुंब वरच्या मजल्यावर झोपले. सकाळी उठल्यावर रोटे यांच्या पत्नी साधना या खाली आल्यावर त्यांना दरवाजाचे कुलुप तुटलेले दिसले. यानंतर घरात पाहणी केल्यावर चोरीचा प्रकार उघड झाला.सुदैवाने मित्रांचे सव्वा लाख रुपये वाचलेप्रदीप रोटे हे मूळचे नशिराबाद येथील रहिवासी आहेत. २५ वषार्पासून ते अयोध्यानगरात वास्तव्यास आहेत. नशिराबाद येथे शेती तर जळगावात पक्षाचे काम करतात. नशिराबाद येथील जवळच्या मित्राने रोटे यांना सव्वा लाख रुपयांची रक्कम ठेवण्यासाठी दिली होती. रोटे यांनी ती घरी कपाटात सुरक्षीत ठेवली होती. रविवारी सकाळीच त्यांनी मित्राला ती रक्कम परत केली. ही परत केली नसती तर चोरी होवून मोठे नुकसान झाले असते.दोन दिवसांपासून दुचाकीवरुन रेकीरोटे यांच्या शेजारचे तिवारी तसेच वाणी यांच्या माहितीनुसार एक जण दुचाकीवरुन रोज ये-जा करत होता. रोटे मंडळ अध्यक्ष असल्याने त्यांच्या घरी १३ रोजी निवडणुकीच्या प्रचारार्थ मोदींचे मास्क व टी-शर्ट असे साहित्य आले. रेकी करणाºयाला निवडणुकीत वाटपासाठी पैसा आल्याचे वाटले. मोठी रक्कम हाती लागेल म्हणून चोरट्यांनी रविवारी रात्री रोटेंच्या घराचे कुलुप तोडले. खोके तपासले असता त्यात निवडणुकीचे साहित्य दिसले. ते तसेच सोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून ५ हजार रुपये लांबविले. देवघरातील चांदीचा ग्लास देव सुरक्षित आहे.कुत्र्यांचा जीव घेवून नंतर चोरीदरम्यान, गल्लीत आल्यानंतर चोरट्यांना पाहून कुत्रा भुंकायला लागला. घरात घुसण्यापूर्वी चोरट्यांनी त्याला ठार मारले. त्यानंतर घरात घुसून रक्कम लांबविली. सकाळी उठल्यावर उभ्या चारचाकीवर रक्ताचे डाग दिसल्याने कुत्र्याला मारल्याचा प्रकार समोर आला. यानंतर रोटे यांच्या घरी आलेल्या नगरसेवकांनी महापालिकेचे गाडी बोलावून मेलेल्या कुत्र्याची विल्हेवाट लावली.

टॅग्स :Jalgaonजळगाव