शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नरभक्षक बिबटय़ाला जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 12:26 IST

दोघांचे बळी, परिसरात भीती

ठळक मुद्देबिबटय़ाच्या हल्यात महिला ठार  हल्ला तीव्र  स्वरुपाचा, महिला जागीच गतप्राणवनविभाग बिबटय़ाला जेरबंद करण्यात अपयशी

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव : दि. 12 - नरभक्षक बिबटय़ाच्या हल्ल्यात महिन्याभरात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. वनविभागाला बिबटय़ाला जेरबंद करण्यात अपयश आल्याने पिलखोड, सायगाव, उंबरखेड परिसरात भीतीचा थरार कायम आहे. सोमवारी बिबटय़ाने झडप घालून उंबरखेड येथील आणि पिंपळवाड म्हाळसा शिवारातील शेतीत काम करणा:या अलकाबाई गणपत अहिरे या 48 वर्षीय महिलेला ठार केले. हल्ला इतका तीव्र होता की, ही महिला जागीच ठार झाली. महिन्याभरात बिबटय़ाने सातत्याने दर्शन देत हल्लेही केले आहेत. सुरुवातीला गुरांचा घास घेणा-या बिबट्याने आता  शेतात काम करणा:यांना लक्ष केले आहे.  उंबरखेड गिरणा नदीपात्राजवळील हर्षल चव्हाण आठ या  वर्षीय मुलाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला आहे. यापूर्वीही बिबटय़ाने आठ ते दहा बक:या, बोकड आदींचा  फडशा पाडला आहे. वनविभाग सुस्तचगेल्या काही महिन्यापासून मन्याड पटय़ात बिबटय़ाने आपला तळ ठोकला असून, सातत्याने तो हल्ले करीत आहे. वनविभागाला बिबटय़ाला पकडण्यात अपयश आले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरणही कायम आहे. ऊसात निवारा  मन्याड व गिरणा परिसरात शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणात ऊस उभा आहे. याच उंच वाढलेल्या ऊसात बिबटय़ा दबा धरुन बसतो. शेतात काम करणा:या एकटय़ा-दुकटय़ा सावजाला हेरुन आपले  काम फत्ते करतो. परिसरात शेतात कामाला जाण्यासाठी मजूर आणि शेतकरी घाबरत आहे. सायगाव येथेही गेल्या महिन्यात बिबटय़ाने तीन महिलांवर हल्ला केला. यात दोघी गंभीर जखमी झाल्या आहे.

उपवनसंरक्षकांची घटनास्थळाची पाहणी जळगाव विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक एन.ए. पाटील, एस. आर. पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. वनविभागाच्या कर्मचा:यांना सूचनाही केल्या.   दरम्यान वनविभागाने पिंपळवाडा म्हाळसा परिसरात बिबटय़ाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची तयारी सुरू केली आहे. पिलखोड परिसरात यापूर्वीच पिंजरा लावण्यात आला असून परिसरात खबरदारी घ्यावयाच्या सूचनांची छापील पत्रकेही वाटल्याची माहिती चाळीसगाव वनविभागाचे संजय मोरे यांनी दिली.