शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचे अतोनात हाल - चाळीसगाव येथे आयोजित ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रमातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 15:55 IST

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अन्न साखळी जिवंत ठेवा

चाळीसगाव : पक्ष्यांना दाणा-पाणी देण्याचे संस्कार नकळतपणे बालवयात आपणावर रुजवले जातात. पण आताच्या सिमेंटच्या जंगलांमध्ये पक्ष्यांना अन्न पाणी मिळत नसल्यामुळे त्यांचे अतोनात हाल होतात, असा सूर येथे आयोजित ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रमाच्या समारोप्रसंगी उमटला. पक्षी निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावत असतात, यासाठी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्ष्यांची अन्नसाखळी जिवंत ठेवायला हवी, असे आवाहन कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ. सुनील राजपूत यांनी केले.शहरातील चंपाबाई रामरतन कळंत्री महाविद्यालयात २३ रोजी ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रमाची सांगता झाली, त्यावेळी ते बोलत होते. युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळाच्यावतीने शाळा, महाविद्यालयातून जनजागृती करण्यात आली असून शाळेतील आवारात मातीच्या भांड्यांची व्यवस्था करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. सुनील राजपूत, युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, मुख्याध्यापक प्रमोद दायमा आदी मान्यवर उपस्थित होते...तर पक्ष्यांचा जीव वाचू शकतोपाण्याच्या शोधात पक्षांना लांब भटकंती करावी लागते. उन्हाळ्यात पाण्याअभावी तहानेने व्याकूळ होऊन शेकडो पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागतात. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीवर, झाडावर, सावलीच्या ठिकाणी पाण्याचे भांडी भरुन ठेवल्यास हजारो पक्ष्यांचा जीव वाचू शकतो, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळातर्फे जागतिक चिमणी दिनापासून ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून याची सांगता शनिवारी करण्यात आली, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक स्वप्नील कोतकर यांनी दिली.पर्यावरण रक्षणासाठी पहिले पाऊलयावेळी सुचित्रा पाटील यांनी सांगितले की, स्वत:पासून सुरुवात केली तर सर्व काही बदलू शकते. पर्यावरण रक्षणासाठी पहिले पाऊल उचलण्याची गरज असून माणुसकीचा मूलमंत्र लक्षात ठेवून संस्थेच्यावतीने पक्ष्यांपर्यंत पाणी हा उपक्रम सुरु करण्याचा मानस हाती घेतला असून शहरातील विविध भागात परळ ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.बदलत्या जीवनशैलीने पक्ष्यांची संख्या घटतेयमानवाच्या राहणीमानाच्या बदलत्या संकल्पनेमुळे पक्ष्यांचीदेखील संख्या कमी होऊ लागली आहे. तहान आणि भुकेने व्याकूळ झालेल्या पक्ष्यांनादेखील सर्व नागरिकांच्या सहकार्याची जोड हवी आहे, तेव्हाच या उपक्रमाचे खरे सार्थक होईल, अशी भावना स्मिता बच्छाव यांनी व्यक्त केली आहे.अन् पक्षांना मिळाला आधार२० ते २३ मार्च पर्यंत ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रम जागराने शहर ढवळून निघाले. पक्षीमित्र भावना जागविण्यात भरारी घेतली असून ही भावना आपल्यासह समाजामध्ये कायम रहावी यासाठी शहरातील विविध शाळांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे पालकांमध्ये विशेष कौतूक असून विद्यार्थ्यांनी आपल्या घरात असलेली जुन्या भांड्यांची स्वत: परळ तयार करुन घराच्या परिसरात लावण्यासाठी हट्ट धरल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली असल्याचे या वेळी पालकांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव