शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वाकडीच्या घटनेवर राज्याचे लक्ष केंद्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:19 IST

मुलांवर अत्याचार प्रकरण

ठळक मुद्दे अनुसूचित जाती जमाती आयोग, बालहक्क आयोग व विविध मंत्री आज देणार भेट पालकमंत्र्यांची जळगावात येऊनही वाकडीकडे पाठ

जळगाव: जामनेर तालुक्यातील वाकडी येथे मनाई करूनही विहिरीत पोहोल्याबद्दल मातंग समाजाच्या मुलांना अमानुषपणे मारहाण करून नग्न धिंड काढल्याचे प्रकरण चांगलेच तापले असून या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. त्याची दखल घेत अनुसुचीत जाती जमाती आयोग, बालहक्क आयोग तसेच विविध मंत्री शनिवार, १६ जून रोजी औरंगाबाद मार्गे वाकडी येथे भेट देणार आहेत.महाराष्टÑ राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे, सदस्य (विधी) न्या.सी.एल.थूल, सदस्य (सेवा) मधुकर गायकवाड हे शुक्रवारी रात्रीच मुंबईहून जळगावाला येण्यासाठी रवाना झाले असून शनिवार, १६ जून रोजी सकाळी ८ वाजता जळगाव येथील सर्कीट हाऊस येथून डी.व्ही.कारने जामनेरकडे रवाना होणार आहेत. सकाळी ९.३० वाजता वाकडी गाव व घटनास्थळाला भेट तसेच पिडीतांच्या घरी भेट देणार असून पोलीस तपास अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी पुढील कारवाईबाबत चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत.बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे हे देखील दि.१६ रोजी औरंगाबादहून सकाळी ८वाजता निघून वाकडी ता.जामनेर येथे भेट देऊन अल्पवयीन बालकांवरील अत्याचारासंदर्भात अल्पवयीन मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. याप्रसंगी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी व बाल कल्याण समिती पदाधिकारी घटनेबाबतचा सविस्तर अहवाल अध्यक्षांना सादर करतील.तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे देखील शनिवार १६ मे रोजी सकाळी १० वाजता औरंगाबाद मार्गे वाकडी येथे भेट देणार आहेत. यावेळी ते पिडीत व जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याशी चर्चा करतील.पालकमंत्र्यांची जळगावात येऊनही वाकडीकडे पाठपालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील शिक्षक मतदार संघ निवडणुकीसंदर्भात भेटीगाठींसाठी शनिवार १६ जून रोजी जळगावात आहेत. शुक्रवारी रात्रीच उशीरा ते जळगावात पोहोचणार असल्याचे त्यांच्या अधिकृत दौऱ्यात म्हटले आहे. मात्र जळगावातील भेटीगाठी आटोपून ते धरणगाव, अमळनेर व तेथून धुळे मार्गे मुंबईला रवाना होणार आहेत. या दौºयात वाकडीला भेट देण्याचे समाविष्ट नसल्याचे व शुक्रवारी रात्री ७.३० पर्यंत दौºयात काहीही बदल आलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पालकमंत्री जळगावात येऊनही वाकडीकडे पाठ फिरवून निघून जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.