शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

फुले मार्केटचे व्यापारी करारास तयार

By admin | Updated: August 27, 2014 15:10 IST

मार्केट गाळे लिलावाने भाडेतत्त्वावर देण्याच्या ठरावावरील स्थगिती उठविण्यात आली असून गाळे बाजार भावाने अथवा लिलावाने देण्याबाबत मनपा महासभेने निर्णय घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

 मुख्यमंत्र्यांनी कर्जफेडीसाठी दिले दोन पर्याय

 
कर्जमुक्तीची प्रक्रिया सुरू : रेडीरेकनरच्या दराने गाळे करारासंदर्भात आज विशेष महासभा
 
जळगाव : मनपाच्या बँक खाते सील प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत २२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मनपाच्या सर्व मार्केट गाळे लिलावाने भाडेतत्त्वावर देण्याच्या ठरावावरील स्थगिती उठविण्यात आली असून गाळे बाजार भावाने (रेडीरेकनरच्या वेटेड अँव्हरेज)ने अथवा लिलावाने देण्याबाबत मनपा महासभेने निर्णय घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी मनपा प्रशासन व पदाधिकार्‍यांनी तातडीने हालचाली करीत व्यापार्‍यांची बैठक घेतली. यावेळी फुले व सेंट्रल फुले मार्केटच्या व्यापारी प्रतिनिधींनी मनपाशी कराराची तयारी दर्शविली. मात्र इतर व्यापारी संकुलातील व्यापार्‍यांनी मात्र विरोध दर्शविला. दरम्यान या विषयावर निर्णय घेण्यासाठी बुधवार २७ रोजी तातडीने विशेष महासभेचे आयोजनही करण्यात आले आहे. 
सर्व पक्षीय गटनेते, पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आयुक्त संजय कापडणीस यांनी मुंबईच्या बैठकीतील चर्चेची माहिती दिली. तसेच रेडीरेकनरच्या वेटेड अँव्हरेजने प्रिमीयम आकारणी करण्याच्या मुद्यावर व्यापार्‍यांकडून सूचना मागविण्यात आल्या. याच संदर्भात दिवसभरात सनदी लेखापालांची (सी.ए.) तसेच गटनेत्यांची अशा स्वतंत्र बैठकाही पार पडल्या. 
दुपारी १२-३0 वाजेच्या सुमारास आयुक्तांच्या दालनातच सनदी लेखापालांसोबत बैठक झाली. त्यात आयुक्तांनी रेडीरेकनरच्या वेटेड अँव्हरेजने प्रिमीयम आकारणी करण्याच्या मुद्यावर सूत्र सुचविण्याची विनंती केली. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मनपाच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात बैठक झाली. त्यास महापौर, पदाधिकारी व इतर गटनेत्यांसोबतच भाजपाचे गटनेते डॉ.अश्‍वीन सोनवणे, विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांचीही उपस्थिती होती. तसेच गाळेधारक कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे, डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, प्रकाश समदडिया, रमेश मताणी, प्रदीप मंडोरा, राजस कोतवाल यांच्यासह मोठय़ा संख्येने व्यापारी उपस्थित होते. आयुक्तांनी मुंबईत झालेल्या बैठकीचे इतवृत्त वाचून दाखविले. तसेच दिलेल्या पर्यायांची माहिती उपस्थितांना दिली. सूत्र ठरविण्यासाठी आणखी काही सूचना असल्यास बुधवारी सकाळी १0 वाजता पुन्हा बैठक होऊन त्यावर चर्चा करण्यात येणार आहे.
 
भाजपा सदस्यांची कोंडी
 
पक्षाचे नेते आ.खडसे यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पर्यायांबाबत ही बैठक होत असल्याने त्यात व्यापार्‍यांच्या हिताच्या दृष्टीने बाजू मांडतानाही काय बोलावे? अशी अडचण भाजपाचे गटनेते, विरोधी पक्षनेते व सदस्यांची झाली आहे. त्यामुळे बुधवारी महासभेत हा विषय फारशी वादावादी न होताच मंजूर होण्याची चिन्हे आहेत. 2 मनपाने एकरक्कमी कर्जफेड करावी. त्यासाठी मार्केट गाळ्यांच्या माध्यमातून पैसा उभा करावा. ती रक्कम कमी पडल्यास खुल्या भूखंडांची निविदा मागवून विक्री करण्याची मुभाही दिली. मार्केट गाळे लिलावाने भाड्याने देण्याच्या विषयाला मुख्यमंत्र्यांनीच स्थगिती दिली होती. ती उठविण्यात आली. मनपाने रेडीरेकनरचा दर व ३0 वर्षातील रेडीरेकरनचा दर याचा मध्य (वेटेड अँव्हरेज) काढून त्यानुसार प्रिमियम आकारणी करावी.कोणता पर्याय निवडावा याचा निर्णय महासभेने घ्यावा. 1 नगरविकास सचिवांनी मनपाच्या हुडकोकडील कर्ज थकबाकीच्या तडजोडीसंदर्भात (वन टाईम सेटलमेंट) प्रस्ताव तयार करावा.तसेच त्यास हुडकोच्या अधिकार्‍यांची मान्यता घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी कर्जफेडीसाठी दिले दोन पर्याय अन्य मार्केटचा विरोध बैठकीत चर्चेनंतर फुले व सेंट्रल फुले मार्केटच्या व्यापार्‍यांनी रेडीरेकनरच्या वेटेडे अँव्हरेजने प्रिमीयम आकारणीच्या प्रस्तावाला संमती दिली. राजकुमार अडवाणी, बबलु समदडिया यांनी जे व्यापारी करार करून देण्यास तयार आहेत, त्यांना करार करून द्यावेत. इतरांसाठी सोयीने धोरण ठरवावे, असे सांगितले. मात्र इतर मार्केटच्या गाळेधारकांचा मात्र विरोध असून एवढा प्रिमीयम देणे शक्य नसल्याने काही तोडगा काढावा, अशी या गाळेधारकांची मागणी आहे. त्यांना मनपा त्रिपक्षीय करार करून देण्यास तयार असून त्यामुळे बँकेकडून कर्ज मिळू शकेल, असा पर्याय सुचविण्यात आला आहे.