शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
3
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
4
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
5
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
6
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
7
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
8
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
9
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
10
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
11
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
12
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
13
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
14
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
15
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
16
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
17
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
19
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
20
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कजगावात बहरतेय बांबूची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 20:43 IST

कजगावचे प्रगतिशील शेतकरी मांगीलाल जैन आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करीत शेती आगळ्या वेगळ्या पध्दतीने फुलवत आहेत.

ठळक मुद्देदररोज सकाळी पाच तास उद्योगव्यवसायाबरोबर शेतीचीदेखील आवड 

प्रमोद ललवाणी

कजगाव, ता.भडगाव : उद्योग व्यवसायाबरोबर शेतीची विशेष आवड असलेले कजगावचे प्रगतिशील शेतकरी मांगीलाल जैन आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करीत शेती आगळ्या वेगळ्या पध्दतीने फुलवत आहेत. शेतात फुललेली त्यांची बांबूची शेती आकर्षण ठरत आहे.कजगाव परिसरही केळी उत्पन्नासाठी भारतात प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या सात-आठ वर्षात कमी पावसामुळे केळी लागवड सातत्याने कमी होत गेली. पण गेल्या दोन वर्षापासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे जलपातळी वाढल्याने कजगाव पट्ट्यातील केळी लागवडीसह अन्य फळ बागायत वाढू लागली आहे. यात केळी, मोसंबी, लिंबू, पपई, ऊस यासह अनेक फळ बागायत लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.येथील प्रगतिशील शेतकरी तथा उद्योजक मांगीलाल जैन यांनी आपल्या शेतात आंबा, चिकू, लिंबू, सीताफळ, नारळासह अनेक फळांची लागवड केली. यात पुन्हा गेल्या वर्षी पाच एकर क्षेत्रात अडीच  हजार  बांबू रोपाची लागवड केली. वर्षभरात बांबू २० ते २५ फूट वाढल्याने या बांबूची शेती एक जंगलच बनले आहे. सर्वदूर फळबागा त्यात डोलदार उभे बांबू प्रत्येकाचे आकर्षण ठरत आहे, तर संपूर्ण शेती फळबाग करत या ठिकाणी साडेपाचशे लिंबू, साडेतीनशे चिकू, पाचशे आंबा, १२५ नारळ, १२५ सीताफळ व अन्य फळाची लागवड केली आहे. पूर्ण क्षेत्रच फळबाग केल्याने परिसर सौंदर्याने नटला आहे.

आपल्या उद्योग-व्यवसायातून सकाळचा पाच तास वेळ शेतीसाठी देत संपूर्ण शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची आवड ही सुरुवातीपासूनच आहे. या आवडीतूनच संपूर्ण शेतजमीन फळबागायत केली आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी पाच एकर क्षेत्रात अडीच हजार बांबूची लागवड केली आहे. आज हे बांबू डोलदार उभे आहेत. त्या पद्धतीनेच इतर फळबागदेखील डोलदार उभी आहेत. फळबागेपासून दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते. शेतीची आवड जास्त असल्यामुळे तिला फुलवण्याचा छंदच लागला आहे. यात एक वेगळाच आनंद मिळतो. सोबतच चांगले आरोग्यदेखील राहते.-मांगीलाल जैन, प्रगतिशील शेतकरी तथा उद्योजक, कजगाव, ता.भडगाव