शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाच्या सतर्कतेने यावलचा अपह्रत मुलगा सुखरुप, मुलाला सोडून आरोपीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 12:16 IST

दक्षता पोलीस लाईनमध्ये आनंद

ठळक मुद्देपाचोरा रेल्वेस्टेशनवर रडताना आढळलाघरी न आल्याने जळगावात शोधाशोध

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10- तोंडाला लाल रुमाल बांधून आलेल्या एका व्यक्तीने दक्षता नगर पोलीस लाईनमधील उजेर शेख जाकीर (वय 13) या मुलाचे अपहरण केल्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने त्याला पाचोरा स्थानकावर सोडून रेल्वेने हा अपहरणकर्ता पुढे गेला. जळगाव येथून जाताना त्याने दुचाकी रेल्वे स्टेशनवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लावल्याचे उजेर याने सांगितले. दरम्यान, पाचोरा स्थानकावरील राहूल पवार या प्रवाशाच्या समयसूचकतेने हा मुलगा सुखरुप राहिला.अपहरण झालेला उजेर हा शनिवारी पहाटे तीन वाजता जळगावात घरी आला. लोकमत प्रतिनिधीने त्याची भेट घेतली असता उजेर याने आपबिती कथन केली, ती त्याच्याच शब्दात.उजेर हा शुक्रवारी रात्री नमाज पठण करुन आल्यानंतर शाहू नगरात मदरशात गेला होता. तेथून परत येत असताना रात्री नऊ ते साडे नऊ या दरम्यान तोंडाला लाल रुमाल बांधलेला एक दुचाकीस्वार जवळ आला. कुठे जायचे आहे असे त्याने विचारले. घरी जात असल्याचे सांगितल्यानंतर ‘मी तुला घरी सोडतो’ असे सांगून दुचाकीवर बसवून थेट रेल्वे स्टेशन गाठले. तेथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दुचाकी लावली व नंतर रेल्वेत बसवून नेले. इतका सारा प्रकार घडत असताना नेमके काय होते आहे हे  उजेर याला कळलेच नाही.बराच वेळ झाल्यानंतरही उजेर घरी न आल्याने जळगावात त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु होती. त्याच्या आईने जळगावातील नातेवाईकांना तो पाचोरा रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व नातेवाईकांचा जावीत जीव आला. ही माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आत्याचे पती हेडकॉन्स्टेबल सलीम खान बशारत खान, अफजल खान, रईस शेख असे तातडीने कारने पाचोरा रवाना झाले. तेथे लोहमार्ग पोलीस ईश्वर बोरडे व सहका:यांनी उजेर याला साडे बारा वाजता नातेवाईकांच्या ताब्यात दिले. प्रवाशी पवार हे देखील थांबून होते. उजेर याला घेऊन नातेवाईक पहाटे तीन वाजता जळगावात पोहचले.उजेर हा यावल येथील रहिवाशी आहे. वडील जाकीर शेख शेती व्यवसाय करतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मुलाचे चांगले शिक्षण व्हावे यासाठी त्याला जळगाव येथे आत्याकडे यंदापासून         पाठविण्यात आले आहे. त्याच्या आत्याचे पती सलीम खान बशारत खान हे पोलीस दलात हेडकॉन्स्टेबल आहेत. बॅँडमास्तर म्हणून ते कार्यरत आहेत. पाचोरा रेल्वेस्टेशनवर रडताना आढळला अपहरणकर्ता व  उजेर हे दोन्ही जण रात्री 10.30 वाजता पाचोरा रेल्वे स्थानकावर उतरले. त्यावेळी आपण कुठे आहोत याबाबत  उजेर याला थोडी जाणीव झाली.  उजेर याची चंचलता लक्षात आल्यानंतर अपहरणकर्ता त्याला पाचोरा रेल्वे स्टेशनवर सोडून त्याच गाडीत बसून पुढे रवाना झाला. थोडय़ावेळाने सर्व प्रवाशी निघून गेल्यानंतर स्टेशनवर गर्दी कमी झाली होती.  उजेर हा प्लॅटफार्म क्र मांक तीनवर रडत असताना राहूल पवार या प्रवाशाच्या लक्षात आले. त्यांनी आस्थेवाईकपणे उजेरची चौकशी केली असता तो जळगावचा असल्याचे समजले. एकटा व इतक्या रात्री इकडे कसा म्हणून पवार यांना प्रश्न पडला. त्यांनी घरातील कोणाचा मोबाईल अथवा फोन क्रमांक विचारला. तेथून लोहमार्ग पोलीस चौकीत नेले. तेथील पोलिसांनाही पवार यांनी घटनेची माहिती दिली.