शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

अमळनेरात धुळवडीला उठल्या अग्नीच्या ज्वाला, धुराचे लोट आणि राखेचा धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 11:31 IST

धुळवडीला स्मशानभूमीत प्रेतं मावत नव्हती.

संजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर : सरडा आणि माणसाप्रमाणे कोरोनानेही रंग बदलले असल्याने गेल्या वर्षापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा धुलिवंदनाला आनंदाचे रंग उधळण्याऐवजी दुःखाच्या अग्नीज्वाला, राखेचे ढीग आणि   धुराचे लोट उधळले.  धुलीवंदनाच्या दिवशी १५ अंत्ययात्रा निघाल्याने स्मशानभूमीत जिकडे-तिकडे प्रेतं जळत असल्याचे विदारक दृश्य पाहून सामान्यांचे काळीज जळत होते.गेल्या वर्षापेक्षा यंदा कोरोनाने गुणधर्म बदलले असल्याचे निदर्शनास आले आहे. २९ रोजी ताडेपुरा स्मशानभूमीत सायंकाळी साडेसहापर्यंत १५ अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापैकी ११ नगरपालिकेतर्फे करण्यात आले. शकुंतला केशरसिंग परदेशी रा.रामवाडी, भटू नथु चौधरी रा.संतोषी माता गल्ली, राजधर नथ्थु निकुंभ रा.शिवशक्ती चौक, कमलाकर नीळकंठ शिसोदे रा.डांगरी, अहिल्याबाई नवल पाटील रा.पाटील कॉलनी, कुबेर हरी माळी रा.अंबापिंप्री, सायंकाबाई गुलाब देवरे रा.पैलाड भवानी चौक, विश्वासराव चिंधा सोनवणे रा.हातेड, ता.चोपडा, कमलबाई राजधर निकुंभ रा.शिवशक्ती चौक, सीताबाई ठाकूर रा.बोरसे गल्ली, दामोदर रामचंद्र सोनवणे रा.पिंपळेरोड आनंद नगर यांचा मृतांमध्ये समावेश आहे. स्मशानभूमीत एक प्रेत जळत नाही तोच दुसरे आणले जात होते. जिकडे तिकडे प्रेतं जळत होती. आधीच्या प्रेतांची राख पडलेली होती. काहींच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. धुलीवंदनाच्या दिवशी अग्नीच्या ज्वाला उसळत होत्या. धुराचे लोट आकाशात उठत होते. प्रेतांची राख उडत होती. हे सारे दृश्य पाहून सामान्यांचे काळीज भीतीने चुरचुरत होते.नागरिक आधीच काळजी घेत नाहीत. बेफिकिरीने वागतात. नंतर त्रास होतो. तेव्हा धावपळ करतात आणि त्यावेळी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन मिळत नाही. त्यावेळी प्रशासनाच्या नावाने आरडाओरड करतात. त्यापेक्षा चाचण्या करा आणि घरीच राहून तत्काळ उपाययोजना करा. म्हणजे अनर्थ घडणार नाही, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmalnerअमळनेर