शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे पाच वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:50 IST

महामार्गाच्या कामासाठी उपसा झाल्याची शक्यता, चारही वाहने जामनेर पोलीस ठाण्यात जमा

जळगाव : शहरासह जिल्ह्यात गौण खनिजाचा बेसुमार उपसा सुरूच असून शुक्रवारी मध्यरात्री मुरुमाची तीन व खडीची वाहतूक करणारे एक डंपर तर वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले आहे. हे पाचही वाहने जामनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या कामासाठी या गौण खनिजाची वाहतूक केली जात असल्याचे सांगितले जात असून या मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास सर्रासपणे गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारीही वाढत आहे.दरम्यान, गेल्याच महिन्यात महामार्गाच्या कामासाठी मुरूमचा अवैधरित्या उपसा करून त्याची वाहतूक करीत असलेले दोन डंपर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनाच आढळून आले होते. क्षमतेपेक्षा अधिक मुरूमचा उपसा केल्याने त्या डंपर मालकांला एक कोटी तीन लाख चार हजारांचा दंड करण्यात आला होता, तरीदेखील हा उपसा सुरूच आहे.जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असताना वाळूचा बेसुमार उपसा सुरू असल्याचे दररोज समोर येत आहे. या सोबतच मुरुम, खडी यांचीही अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यात सध्या जळगाव-औरंगाबाद मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्या कामासाठी या मार्गावरुन गौण खनिजाची वाहतूक करणारे वाहने सुसाट जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे.शुक्रवारी मध्यरात्री महसूल विभागाचे पथक जळगाव-औरंगाबाद मार्गावर गस्त घालत असताना जामनेर तालुक्यातील पाळधीनजीक गौण खनिजाची वाहतूक करणारे चार डंपर पथकाला आढळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यात तीन डंपरमध्ये मुरुम तर एका डंपरमध्ये खडी आढळून आली. कागदपत्रांची विचारणा केली असता गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी असणाऱ्या पावत्यांवर महसूल विभागाचा शिक्का नव्हता व परवानाही नव्हता. पहाटे चार वाजता ही चारही डंपर जामनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या.तत्पूर्वी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नेरी येथे जामनेर फाट्यानजीक वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टरही आढळून आले. तेदेखील जप्त करण्यात येऊन जामनेर पोलीस ठाण्यात लावण्यात आले.प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून अतुल सानप, जगदीश धमाले, पो.कॉ. हितेश महाजन यांनी ही कारवाई केली.निकषाकडे लक्षसंध्याकाळी सहा वाजेनंतर महामार्गाचे काम करू नये, असे शासनाचे १३ जानेवारी २०१८चे परिपत्रक आहे. मात्र, जळगाव-औरंगाबाद मार्गाच्या कामासाठी मध्यरात्रीच्या वेळी गौण खनिजाची सर्रास वाहतूक सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव