अनोळखी महिलेचा रेल्वेचा धक्का लागून मृत्यू
जळगाव : असोदा रेल्वेगेटजवळ खांबा क्रमांक ४२२/१८ ते २० दरम्यान एका ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी महिलेचा रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली आहे. महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.
गणेश कॉलनीत घरफोडी
जळगाव : गणेश कॉलनीत स्वप्नील लढे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. लढे दाम्पत्य मुंबईला गेलेले आहेत. घरफोडीचा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आला. त्यांनी लढे व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. नेमका काय मुद्देमाल चोरीला गेला हे सांगता येणार नसल्याची माहिती लढे यांनी भ्रमणध्वनीवरून बोलताना दिली.