शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

रतलामजवळील अपघातात जळगावचे पाच जण ठार

By admin | Updated: May 10, 2014 19:46 IST

महावीर कुमावत खेमराज कुमावत कंकुदेवी कुमावत ओमप्रकाश कुमावत गोपाल कुमावत जळगाव : मध्यप्रदेशातील रतलाम पासून काही अंतरावर असलेल्या हसन पालिया टोलनाक्याजवळ..

महावीर कुमावत खेमराज कुमावत कंकुदेवी कुमावत ओमप्रकाश कुमावत गोपाल कुमावत जळगाव : मध्यप्रदेशातील रतलाम पासून काही अंतरावर असलेल्या हसन पालिया टोलनाक्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ट्रेलरने दिलेल्या धडकेत जळगाव येथील सावलिया केटर्सचे संचालक गोपाल महाराज कुमावत यांच्यासह कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारमधील पाच जण बचावले आहेत. मृतांवर राजस्थान येथील त्यांच्या कोरनाथ या मुळ गावी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.जळगाव येथील प्रसिद्ध सावलिया केटर्सचे संचालक गोपाल कन्हैयालाल कुमावत हे कुटुंबासह पाच दिवसांपूर्वी राजस्थान येथील भिलवाडा जिल्ह्यातील कोरनाथ गावी गेले होते. नात्यातील व्यक्तीचा विवाह समारंभ आटोपून गुरुवारी रात्री ते जळगावकडे येण्यासाठी आपल्या एमएच १९ बीजे ४५३२ या कारने निघाले होते. यावेळी कारमध्ये चालक महावीर मांगीलाल कुमावत (वय-३0), गोपाल कुमावत (वय-४५), पत्नी कंकुदेवी कुमावत (वय-३0), भाऊ खेमराज कुमावत (वय-४0), ओमप्रकाश रामलाल कुमावत (वय-१८), मुले भावना कुमावत, वैष्णवी कुमावत, राजेश कुमावत, शामलाल कुमावत व भाचा प्रभू कुमावत बसलेले होते.रात्री कार रतलाममधून निघाल्यानंतर जावरा गावापासून काही अंतरावर असलेल्या हसनपालिया टोलनाक्याजवळ आली. या ठिकाणी चालक महावीर याने जवळच असलेल्या पेट्रोलपंपवर डिझेल भरण्यासाठी कार वळविली. डिझेल भरून कार रस्त्याला लागत असताना समोरून भरधाव येणार्‍या ट्रेलरने जोरात धडक दिली. यात कारचालक महावीर कुमावतसह गोपाल कुमावत, कंकुदेवी कुमावत, खेमराज कुमावत, ओमप्रकाश कुमावत हे पाच जण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की कार दहा ते पंधरा फुटापर्यंत फेकली गेली.या अपघातात गोपाल महाराज यांची दोन मुले व दोन मुली व भाचा मात्र थोडक्यात बचावले. अपघातानंतर पेट्रोलपंपावरील कर्मचारी तसेच टोलनाक्यावरील काही नागरिकांनी जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघातातील मयतांना शासकीय दवाखान्यात आणल्यानंतर शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले.या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गोपाल महाराज यांचे राजस्थानमधील नातेवाईक रतलामच्या दिशेने रवाना झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील कोरनाथ गावी नेण्यात आले. संध्याकाळी मयतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जळगावातील प्रेमनगर येथील त्यांच्या निवासस्थानी त्याचे आप्त, स्वकीय व मित्र परिवाराने गर्दी केली होती.

 

test update