मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील आरोग्य विभागाला बुधवारी दुपारी प्राप्त अहवालात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ इतकी झाली आहे .प्राप्त पाच पॉझिटिव्ह अहवालात एका डॉक्टराचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. कोरोना बधितांचा आकडा सातवर पोहोचल्याने शहरात खळबळ उडाली आहे. संसर्ग झालेल्यांचा शोध घेण्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर जोर दिला जात आहे.दरम्यान, कोरोना संसर्ग संक्रमण वाढ चिंताजनक बाब बनली आहे.दोन रुग्ण आढळताच मुक्ताईनगर शहर तीन दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. आता रुग्ण संख्येत वाढ झल्याने प्रशासन काय पाऊल उचलते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एका पेक्षा जास्त ठिकाणा चे असल्याने आता नवीन भागात ही खबरदारी उपाय योजना करण्यात येणार आहे यात नाट्यगृहा मागील भाग ही सील करण्यात येईल असे सूत्रांचे म्हणणे आहे
मुक्ताईनगरात आणखी पाच रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:04 IST
मतीन शेख मुक्ताईनगर , जि.जळगाव : येथील आरोग्य विभागाला बुधवारी दुपारी प्राप्त अहवालात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून ...
मुक्ताईनगरात आणखी पाच रुग्ण
ठळक मुद्देएका डॉक्टरचाही समावेशआधी दोन रुग्ण आढळल्यानंतर पुन्हा चिंतेत वाढ