शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील पाच बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:03 IST

एकाच दिवसात दहा रुग्ण : मृत तीन जण पॉझिटीव्ह, दोन नव्या भागात रुग्ण

जळगाव : शहरात एकाच दिवशी दहा जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे़ यात आऱ आऱ शाळेजवळील गांधीनगरातील एकाच परिवारातील व बाधित रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचा समावेश आहे़ दुसरीकडे शहरातील तीन मृतांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत़ शहरातील रुग्ण संख्या ६३ वर पोहोचली आहे़गेल्या तीन दिवसांपूर्वी आऱ आऱ शाळेजवळ रहिवास असलेल्या एका प्रौढाचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते़ त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांचीही तपासणी करण्यात आली़ यात पाच लोकांना कोरोना असल्याचे समोर आले आहे़ यात दोन पुरूष व तीन महिलांचा समावेश आहे़ यासह दक्षता नगरातील एका ३२ वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, शाहू नगरातील एक रुग्ण बाधिताच्या संपर्कातील आहे़शहरात रोज नव- नवीन भागात रुग्ण आढळून येत असले तरी बाजारात होणारी गर्दी मात्र कायम असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे.१९६ अहवालांची प्रतीक्षा आहे़जिल्हाभरातून सोमवारी ६५ जणांचे नमुने पाठविण्यात आले असून एकत्रित १९६ अहवालांची प्रतीक्षा आहे़ ४ हजार ७३ जणांची सोमवारी विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे़ दरम्यान, दाखल रूग्णांमध्ये ११ जणांची प्रकृती अत्यवस्थ असून उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे़नव्या परिसरात शिरकावअक्सानगरातील मृत प्रौढ हे बाधिताच्या संपर्कातीलच आहे़ यासह शाहूनगरातील एक महिलाही बाधिताच्या संपर्कातील असून वाघनगरच्या मृत प्रौढांची हिस्ट्री मात्र समोर आलेली नव्हती़ तर दक्षता नगरातील एका पोलिसाचा यात समावेश आहे़ या परिसरातील हा नवीन रुग्ण आहे़ दरम्यान, शाहू नगरातील संपर्कातील ७ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़तीन जणांचा मृत्यूअक्सानगरातील ५९ वर्षीय पुरूष, शाहू नगरातील ३४ वर्षीय महिला यांचा रुग्णालयात दाखल असताना मृत्यू झाला तर वाघनगरातील एका ५० वर्षीय प्रौढाला रुग्णाला शनिवारी मृतावस्थेतच रुग्णालयात आणण्यात आले होते़ या तिघांचे तपासणी अहवाल रविवारी पॉझिटीव्ह आले आहेत़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव