शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाचशे रूपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:52 IST

जमाव बंदीचे केले होते उल्लंघन

जळगाव : अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत असताना जमाव बंदी आदेशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांवर जिल्हापेठ, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्याने काढण्यात आलेले वॉरंट रद्द करण्यासाठी आठ जणांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड मंगळवारी न्यायालयाने ठोठावला. यात माजी खासदार ईश्वरलाल जैन, अ‍ॅड. रवींद्र पाटील, गफ्फार मलीक यांच्यासह अन्य राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.सन २०१३, २०१५ आणि २०१६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासनाच्या विविध धोरणांविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी जिल्हापेठ व एमआयडीसी पोलीस स्टेशनला राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांविरूध्द जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.खटला पोहोचला न्यायालयातदाखल गुन्ह्याचा हा खटला न्यायालयात सुरू झाला़ मात्र, गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून न्यायालयीन कामकाजासाठी दिलेल्या तारखांना राष्टÑवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी वारंवार गैरहजर राहिल्यामुळे या आंदोलकांविरुद्ध न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट बजावले होते.२१ आणि ३० मे रोजी पुढील कामकाजआता भगत बालाणी, नीलेश सुधाकर पाटील, मनोज दयाराम चौधरी, सलीम इनामदार, गणेश बुधो सोनवणे, इब्राहीम मुसा पटेल, आमदार सतीश पाटील, अयाज अली नियाज अली यांच्या वरील खटल्यात २१ व ३० मे रोजी कामकाज होणार आहे.सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.निखील कुळकर्णी यांनी तर संशयितांतर्फे अ‍ॅड.कुणाल पाटील, अ‍ॅड़ अजीम शेख व अ‍ॅड़ इम्रान हुसेन यांनी काम पाहिले.न्यायालयात गर्दीखटल्यात न्यायालयाने राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वॉरंट बजावल्याने हे नेते दुपारसत्रात न्यायालयात आले होते. त्यामुळे या पक्षाचे अनेक कार्यकर्तेही येथे हजर होते.त्यामुळे न्यायालय आवारात मोठी गर्दी झाली होती. तर ही नेते मंडळी नेमकी आली कशासाठी याबाबतही चर्चा रंगल्या होत्या.यांच्या नावे निघाले वॉरंटन्यायालयीन तारखांना वारंवार गैरहजर राहिल्यामुळे माजी खासदार ईश्वरलाल जैन, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलीक, वाल्मीक विक्रम पाटील, मीर नाजीम अली, मंगला भरत पाटील, परेश दिलीप कोल्हे, विशाल गुलाबराव देवकर हे मंगळवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयात कामकाज होऊन न्यायाधीश ए़एस़ शेख यांनी त्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला़ तर यातील फक्त मीर नाजीम अली यास तीनशे रूपयांचा दंड केला आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव