शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने पाडला पाच गो-ह्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:23 IST

रानडुकराच्या हल्ल्यात तरुण जखमी

जळगाव : जामनेर व भडगाव तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून खेडगाव परिसरात चार दिवसात तीन गोºह्यांचा तर मंगळवारी पहाटे जामनेर तालुक्यातील वडगाव सद्दो येथे दोन गोºह्यांचा फडशा पाडला. या सोबतच ४ रोजी जामनेर तालुक्यातील वडगाव सद्दो येथील दीपक कौतिक दांडगे या तरुणावर रानडुकराने हल्ला करून जखमी केले. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.खेडगाव, ता.भडगावसोमवारी रात्री उशिराने पेंडगाव-पथराडच्या जंगलालगत जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेल्या सहादू धर्मा पाटील या शेतकºयाच्या गोºह्यावर बिबट्याने हल्ला चढवत फडशा पाडला. यामुळे पारोळा-भडगाव या दोन तालुक्यांच्या सीमेवरील वनास लागून असलेल्या पेंडगाव, शिवरे, तामसवाडी, पथराड, रताळे आदी गावांतील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने तत्काळ पिंजरे, कॅमेरे आदी लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे यांचा गेल्या काही दिवसांत या भागात उपद्रव वाढला आहे.२८ रोजी पेंडगावी, १ रोजी तामसवाडी, ता.पारोळा व पुन्हा दि.४ च्या रात्री असे तीन दिवस मिळून या मादी बिबट्याने तीन गोºह्यांचा फडशा पाडला. वनविभागाने हे पंचनामे केले असले तरी पंचनाम्यावरच त्यांचे अडले असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. कारण बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असतानाच वनविभागाकडृन त्यास पकडण्यासाठी ंिपंजरे, कॅमेरे लावणे आदी काही एक उपाययोजना करण्यात येत नसल्याने येथे संताप व्यक्त होत आहे. या जंगलास लागून भडगाव तालुक्यातील पेंडगाव, पथराड,जुवार्डी,आडळसे तर पारोळा तालुक्यातील शिवरे,तामसवाडी,रताळे आदी गावे येतात. जंगल असल्याने या गावांमधून पशुपालनाचा व्यवसाय वाढला आहे. यामुळे गावाच्या लोकसंख्येच्या दुप्पट-तिप्पट जनावरांची संख्या येथे आहे. ही जनावरे शेतात-रानात उघड्यावरच बांधलेली असतात. बिबट्याचा वावर वाढल्याने पशुपालकांनी धास्ती घेतली आहे. आधीच दुष्काळ, त्यातच मादी बिबट्याचे हल्ले सुरुच असल्याने जनावरांविषयीची चिंता लागली आहे. आज जनावरांच्या रक्ताची चटक लागलेला बिबट्या उद्या रात्री-बेरात्री शेतावर जाणाºया शेतकºयांच्या जीवावर उठणार नाही हे कशावरुन, अशी भीती व्यक्त होत आहे.तोंडापूर, ता.जामनेरयेथून जवळच असलेल्या वडगाव सद्दो येथे ५ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास विमलबाई सुरेशचंद शर्मा यांच्या मालकीच्या शेतात साधारण तीन वर्षे वयाच्या दोन गोºह्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. वनपाल बळवंत पाटील, वनरक्षक समाधान धनवट, गणेश खंदारे यांनी पंचनामा केला. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. मृत गोºह्याचे पशुधन विकास अधिकारी राहुल ठाकूर यांनी शवविच्छेदन केले. याच शिवारात ४ रोजी सकाळी दीपक कौतिक दांडगे या तरुणावर रानडुकराने हल्ला करून जखमी केले. दीपक दांडगे याच्यावर जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दोन बिबट्यांचा संचारया परीसरात एक नर व मादी अशा दोन बिबट्यांचा वावर असून वन विभागाने याकडे लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. वन्यप्राणी, बिबट्यापासून रक्षण होण्यासाठी पशूधन सुरुक्षित ठिकाणी बांधावे, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव