शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पहिले हजार रुग्ण ७६ दिवसात, ३२ दिवसात वाढले ४ हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:02 IST

चिंताजनक : लॉकडाऊननंतर दररोज वाढताहेत सरासरी ४६ रुग्ण

अजय पाटील ।जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता ५ हजारांपर्यंत पोहचली आहे. २४ मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यानंतर ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा वेग काही प्रमाणात मर्यादित होता. मात्र, १ जून रोजी जाहीर झालेल्या पाचव्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात १ हजार रुग्ण व्हायला ७६ दिवस लागले होते. मात्र, १ हजार ते ५ हजार रुग्णसंख्या व्हायला केवळ ३२ दिवस लागले आहेत. शेवटच्या ३२ दिवसात जिल्ह्यात तब्बल ४ हजार नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे शेवटच्या पाच दिवसात जिल्ह्यात २०० च्या सरासरीने रुग्ण वाढले आहेत.कोरोनाची संख्या वाढत असल्याने जळगाव, भुसावळ व अमळनेर या तीन शहरांमध्ये सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत रुग्णवाढीचा संख्येवर कोणताही परिणाम झालेला नाही.छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड या राज्यापेक्षाही जिल्हा पुढेजळगाव जिल्ह्यात सध्यस्थितीत (९ रोजी सायंकाळपर्यंत) ५ हजार १० इतके रुग्ण आहेत. जळगाव जिल्ह्यापेक्षा देशातील झारखंड,त्रिपुरा, गोवा, छत्तीसगढ व उत्तराखंड सारखे राज्यही मागे आहेत. राज्यात कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत जळगाव जिल्हा आठव्या स्थानावर आहे. रुग्णवाढीचा दर याचवेगाने कायम राहिल्यास केरळ व पंजाब या राज्यांनाही जळगाव जिल्हा मागे टाकण्याची भीती आहे. जिल्ह्यातील वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या आता प्रशासनासाठी व जिल्ह्यातील नागरिकांसाठीही चिंतेचा होत जात आहे.मृत्यूंची संख्याही तीनशे पारजिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीसोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ९८३ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्यस्थितीत १ हजार ७२६ जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक उपचार हे जळगाव शहरात सुरू आहेत. भुसावळ, जळगाव, अमळनेर या शहरांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत जाणारा संसर्ग प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. तसेच नागरिक अजूनही सोशल डिस्टन्सिंगच नियम पाळताना दिसून येत नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव