शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

स्वाध्याय उपक्रमात ‘जळगाव’ राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST

जळगाव : विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन करता यावे, या उद्देशाने शासनातर्फे स्टुडंट व्हॉट्सअ‍ॅप बेस्ड होम अ‍ेसेसमेंट (स्वाध्याय) ...

जळगाव : विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन करता यावे, या उद्देशाने शासनातर्फे स्टुडंट व्हॉट्सअ‍ॅप बेस्ड होम अ‍ेसेसमेंट (स्वाध्याय) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात सर्वाधिक विद्यार्थी सहभाग असणारा ‘जळगाव’ जिल्हा हा राज्यात प्रथम ठरला आहे, तर नाशिक विभागातसुध्दा जळगाव जिल्ह्याने बाजी मारली आहे.

महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे स्टुडंट व्हॉट्सअ‍ॅप बेस्ड डिजिटल होम अ‍ेसेसमेंट योजनेची सुरूवात ३ नोव्हेंबरपासून करण्यात आली आहे. दर शनिवारी घेण्यात येणाऱ्या या उपक्रमास अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळाली. या योजनेंतर्गत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना व्हॉट्स्अ‍ॅपद्वारे सरावासाठी स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात येतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या फोनवर प्रश्नमंजुषा घरच्या घरी उपलब्ध करून देण्यात येते. मराठी आणि गणित या दोन विषयांवर ही सराव चाचणी घेण्यात येते.

या आठवड्यात मारली बाजी...

गेल्या दोन आठवड्यांपासून जळगाव जिल्हा सहभागात तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील ७९ हजार ५१० विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमात सहभाग नोंदवून प्रश्नमंजुषा सोडविली. त्यामुळे या आठवड्यात सर्वाधिक सहभाग असलेला जिल्हा हा जळगाव ठरला आहे. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.