शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात गोपिका नदी तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 19:24 IST

दहिवद : गोपिका नदीत जलपूजन, साडी, चोळी अर्पण, नागरिकांनी केला जल्लोष

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील दहिवद येथे नदी-नाले खोलीकरण केल्याने पहिल्याच पावसात गोपिका नदी तुडुंब भरून वाहू लागली. ग्रामस्थांनी केलेल्या कामाचे फळ मिळाल्याने आनंद व्यक्त करून जलपूजन केले.गावाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काही तरुणांनी गावाचा विकास करण्याचा विडा उचलला. त्यात त्रिसूत्री कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. जलयुक्त शिवार, शिक्षण व वृक्षारोपण असे नियोजन करण्यात आले.जलयुक्त शिवार या योजनेत गाव समाविष्ट व्हावे, यासाठी मुंबई येथे कार्यरत असणारे जयवंत पाटील यांनी प्रांताधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून गाव जलयुक्त शिवारात समाविष्ट करून घेतले. शिक्षण क्षेत्राची व गावातील व्यायामशाळेच्या कामाची धूरा विनोद पाटील यांनी तर वृक्षारोपणाचे काम पंकज पाटील व धर्मवीर भदाणे तत्कालीन ग्रामसेवक संजय पाटील यांच्या सहकार्य लाभले.जलयुक्त शिवाराअंतर्गत गावात सहा सिमेंट बांध, एक दगडी बांधाचे खोलीकरण, लघु पाटबंधारे विभागामार्फत तीन सिमेंट बांध, भूजल विभागामार्फत गाव विहिरीजवळ खोलीकरण अशी कामे करण्यात आलीत. त्यात गावातील राजकीय लोकांनी त्यांना पाठबळ दिले पण पंकज पाटील, गोकुळ माळी, प्रशांत भदाणे, प्रवीण गुलाबराव माळी, बबलू व शिवाजी पारधी यांची मदत झाली.जलयुक्त शिवारचे काम पूर्ण झाल्यानंतरदेखील दोन वर्षांपासून गावात वरूणराजाने कृपादृष्टी केलेली नसल्याने जलयुक्त शिवारातील कामांचा फायदा गावकऱ्यांना होत नव्हता. गावात लागवड केलेली २२०० झाडे २० ते २५ फुट उंचीचे झालेली असतानादेखील पर्जन्य खेचून आणण्यात त्यांचा फायदा होत नाही का, असा नकारात्मक सूर जनतेतून उमटत होता. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या अर्ध्या तासाच्या पावसाने काही मिनिटातच सर्व बांध भरून वाहू लागले. ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सततच्या पाच वर्षांपासून दुष्काळामुळे कोरडी असणाºया गोपिका नदीला यावर्षी आलेल्या पुराच्या पाण्याचे पूजन करण्यात आले व साडी, चोळी अर्पण करण्यात आली. त्यावेळी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :RainपाऊसAmalnerअमळनेर