अमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित पंधराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेत अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘पुस्तक एके पुस्तक’ या नाटकास संदीप घोरपडे यांना दिग्दर्शनाचा प्रथम, तर भूमिका घोरपडे हिला अभिनयाचे रौप्यपदक मिळाले.८ रोजी नाशिक येथे परशुराम साई खेडकर नाट्यगृहात पारितोषिक वितरण समारंभ झाला. ५७व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा आणि पंधराव्या बालनाट्य स्पर्धांचे संयुक्तिक पारितोषिक वितरण नाशिक येथे करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव संदीप शेंडे, संजय जहागीरदार, विनय अवतारी, ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश जाधव यांच्यासह अनेक कलाकार व नाट्यप्रेमी हजर होते.अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘पुस्तक एके पुस्तक’ या नाटकात लहान मुलांना व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांच्या आवडीच्या विषयात सहभागी होण्यास स्वातंत्र्य द्यावे, असा विषय मांडण्यात आला होता.उत्कृष्ट दिग्दर्शनाचा प्रथम व अभिनयाचे रौप्य पदक मिळाल्याबद्दल सानेगुरुजी शाळेचे संस्थापक चेअरमन माजी आमदार गुलाबराव पाटील, अध्यक्ष हेमकांत पाटील, मुख्याध्यापक एस.डी.देशमुख, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे, डी.ए.धनगर यांनी अभिनंदन केले आहे.अमळनेरसारख्या लहानशा शहरात दिग्दर्शनाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाल्याने शहरात कौतुकाचा विषय झाला आहे. यापूवीर्ही ही एकांकिका स्पर्धेत मानाचा पुरुषोत्तम करंडक अमळनेरच्याच ज्ञानेश्वर पाटील याला मिळाला होता.
राज्य बालनाट्य स्पर्धेत अमळनेरला दिग्दर्शनचे प्रथम पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 23:55 IST