शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

धाबे येथे निराधार महिलेच्या घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:15 IST

शॉर्टसर्कीट : पन्नास हजाराचे नुकसान

पारोळा: तालुक्यातील धाबे या ठिकाणी २८ रोजी रविवारी सकाळी दहा वाजता अचानक शॉर्टसर्कीटने निराधार महिलेच्या घराला आग लागून सुमोर पन्नास हजाराचे संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. याचबरोबर बकऱ्यांच्या शेडचेही नुकसान झाले.धाबे येथील जि .प. प्राथमिक शाळेच्या मागे राहणारी निराधार महिला अनुबाई मानसिंग भिल हीस या आगीची झळ बसली आहे. तिने ऊन्हामुळे स्वत: राहण्यासाठी व बोकड बांधण्यासाठी कुडाची झोपडी बनविली होती. अचानक ठिणग्या उडून शॉर्टसर्किट झाले व आग लागली. यावेळी गांवकऱ्यांनी धाव घेत झोपडीतील आठ बोकड बाहेर काढले. या दरम्यान आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे झोपडीत असलेले संसारोपयोगी कपडे, धान्य, आंथरुण व अमळनेरच्या सोमवारच्या बाजारातुन घ्यावयाचे दोन बोकड यासाठी ठेवलेले पैसे रोख १२ हजार २०० रुपये जळुन खाक झाले.या आगीमुळे लगतच असलेली दसनुर तडवी यांचीही झोपडी थोडी जळाली. श्रीमती बनुबाई यांची झोपडी काही प्रमाणात जळाली. काही अंतरावर असणाºया लिंबाच्या झाडालाही झळा बसल्या. गांवकºयांनी शर्थीचे प्रयत्न करून आग अटोक्यात आणली. पारोळा नगर पालिकेची अग्नीशमन गाडीही वेळेवर पोहचली म्हणुन मोठा अनर्थ टळला. सोमवारी नऊ वाजता धाबे हिरापूर तलाठी के. टी. सानप यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. अनुबाई या एकटया असून निराधार आहे. बकºया व बोकड पालन खरेदी विक्रीतुन त्या आपला उदरर्निवाह करतात. सर्वच जळुन खाक झाल्यामुळे त्या हवादिल झाल्या आहेत. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे, तलाठी के. टी. सानप, वीर एकलव्य बजरंग ग्रुप धाबे शाखेचे अध्यक्ष रविंद्र भिल, ग्राम पंचायत कर्मचारी शामा भिल यांनी धीर दिला व मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :fireआग