आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.४ : सिग्नल चौकाजवळ असणाºया गायत्री व्यापारी संकुलात गुरुवारी पहाटे पावणे दोन वाजता मीटर खोलीला आग लागली. अग्निशमन विभागाला कळविण्यात आल्यानंतर तासाभराने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकली नाही.गुरुवारी सकाळी दहा वाजता वाणी मंगल कार्यालयाच्या समोर राहणाºया फकिरा पाटील यांच्या घरातील फ्रीजला शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. अन्य काही सामान आणि फ्रीजवर ठेवलेले दहा हजार रुपये देखील आगीत जळून खाक झाले. शेजारील कुटुंबीयांनी पाणी मारुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहिती पालिका अग्निशमन दलाचे प्रमुख राजेंद्र पाटील यांनी दिली. त्यानंतर सिग्नल चौकाजवळील गायत्री व्यापारी संकुलातील मीटरच्या खोलीला आग लागली. अग्निशमन विभागाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.
चाळीसगाव शहरातील गायत्री व्यापारी संकुलात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 18:01 IST
सिग्नल चौकाजवळ असणाºया गायत्री व्यापारी संकुलात गुरुवारी पहाटे पावणे दोन वाजता मीटर खोलीला आग लागली.
चाळीसगाव शहरातील गायत्री व्यापारी संकुलात आग
ठळक मुद्देगायत्री व्यापारी संकुलातील मीटर रुमला आगफकिरा पाटील यांच्या घरातील फ्रीज जळून खाकआगीचे कारण गुलदस्त्यात