शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फिर्यादीवरून अंजली दमानियांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:48 IST

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांसह सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हाअंजली दमानिया यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांची बैठककल्पना इनामदार यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत बैठकीबाबत दिली माहिती

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१९ - माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना लाच प्रकरणात अडकविण्याचा कट रचल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध खुद्द खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिसात गुरुवारी फिर्याद दिली. त्यावरुन दमानियांसह सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.खडसे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत राज्यभरात तक्रार दाखल करुन आपला छळवाद सुरु केला आहे. त्यांनी स्वत: एकही तक्रार दिलेली नाही, असे अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी जळगावात आल्या असता पत्रकार परिषदेत सांगितले होते, त्याची दखल घेत खडसे यांनी खुद्द मुक्ताईनगर पोलिसात गुरुवारी सायंकाळी दमानियांविरुद्ध फिर्याद दिली.त्यावरुन अंजली दमानिया व त्यांचे पती अनिश व अन्य सहा ते सात जणांविरुध्द कलम ४५१, ४५२, १४९, ११६, १२० (ब), १७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खडसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अंजली दमानिया यांनी त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांना बोलविले. यावेळी त्यांचे पती अनिश दमनिया व अन्य सहा ते सात जण उपस्थित होते. तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीत दमानिया यांनी सांगितले की, तुम्हाला मी काही फाईल आणि पैसे देते. ते तुम्ही खडसे यांच्या कार्यालयात नेऊन त्यांच्या टेबलवर ठेवा आणि मी लगेच लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी पाठवेल. आपल्याला खडसे यांना कसेही करून अडकवायचे आहे. मात्र इनामदार यांनी यास नकार दिला. दरम्यान या प्रकरणी इनामदार यांनी ११ एप्रिल रोजी मुंबई येथील पत्रकार परिषदेत ही बाब उघड केली. यावरून दमानिया यांचा मला लाचप्रकारणात अडकविण्याचा कट होता, असेही खडसे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.