शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

191 फुकटय़ा प्रवाशांकडून दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 23:30 IST

वरणगाव स्थानकावर रेल्वेची तिकिट तपासणी मोहीम : एक लाख 78 हजार रुपये दंड वसूल

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम सुधीर कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आज 9 फेब्रुवारी रोजी अचानक राबविण्यात आलेल्या मोठय़ा प्रणावरील तिकिट तपासणी मोहीमेत (बस रेड/अब्मुॅस चेक)  तब्बल 191 विना तिकिट प्रवाशांकडून 71  हजार 740 रुपये दंड वसूल करण्यात आला. या अचानक व बसने जावून राबविण्यात आलेल्या   तिकिट तपासणी मोहीमेमुळे रेल्वेने तिकिट न काढता फुकट प्रवास करणा:या प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी 6  ते दुपारी 2 वाजेर्पयत भुसावळ विभागातील वरणगाव  रेल्वे स्थानकावर पॅसेंजरसह जलद, अतिजलद मेल/ एक्स्प्रेस गाडय़ा  थांबवून पथकातील  रेल्वे कर्मचारी, अधिकारी यांनी प्रवाशांकडील तिकिटांची  तपासणी केली. ज्या प्रवाशांकडे प्रवासाचे तिकिट नव्हते त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करून त्यांना रितसर पावती देण्यात आली.या तिकिट तपासणी मोहीमेत 191 प्रवासी विना तिकिट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून दंडासहीत 71 हजार 740 रुपये दंड वसूल करण्यात आला   शिवाय अनियमित प्रवास करणा:या 268 प्रवाशांकडून एक लाख पाच  हजार 835 रुपयांची वसुली करण्यात आली. रेल्वे प्रवास करताना सामान (लगेज) बूक न करता प्रवास करणा:या 11 प्रवाशांकडून  1 हजार 120 रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. भुसावळ रेल्वे विभागातर्फे राबविण्यात आलेल्या या मोहीमेत एकूण 470 केसेस व एक लाख 78 हजार 695 रुपये दंड वसूल करण्यात आला.   रेल्वेचे पथक बसने जावून ज्या रेल्वे स्थानकावर तिकिट तपासणी मोहीम राबवायची आहे. त्या स्थानकार्पयत बसने जावून अचानक गाडी थांबवून प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करण्याच्या या अनोख्या पद्धतीने प्रवाशीही बुचकळ्यात पडले आहेत. मेल/ एक्प्रेस लहान स्थानकावर थांबविण्याची पद्धतही नवीन आहे.(प्रतिनिधी)तपासणीतील सहभाग2 सुधीर कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक व्ही.पी.दहाट,  सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक  अजय कुमार,  तिकिट निरीक्षक बी.एस़तडवी, मुख्य निरीक्षक एच. एस.अहुवालिया यांच्या नेतृत्वाखाली 37 तिकिट तपासणी कर्मचारी, 23  आरपीएफ व लोहमार्ग पोलीसचे दहा कर्मचारी मोहीमेत तैनात होते.या गाडय़ांमध्ये झाली तपासणी3 51183 भुसावळ-नरखेड पॅसेंजर, 11039 महाराष्ट्र एक्स्प्रेस,12833 अहमदाबाद-हावडा, 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस,12656  चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस, 51198 वर्धा-भुसावळ पॅसेंजर, 17037 सिकंदराबाद बिकानेर एक्स्प्रेस, 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस,12720 हैद्राबाद-अजमेर एक्स्प्रेस   वरणगाव स्थानकावर थांबवून   तिकिटांची तपासणी केली.प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोहीम..4भुसावळ येथून तिकिट तपासणी पथक बसने  वरणगाव येथे दाखल झाले. बसमधून उतरताच वाणिज्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी  प्रवासी गाडय़ांची तपासणी केली. भुसावळ विभागातर्फे प्रथमच अशा पद्धतीने बसने जावून तिकिट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. या पुढेही अशाच पद्धतीने तिकिट तपासणी मोहीम राबविण्यावर भर राहील. प्रवासी संख्या वाढीसासाठी अशी मोहीम राबविली जाते, असे सांगण्यात आले आहे. यातून महसुलही वाढतो.