पारोळा : तालुक्यातील मंगरू येथे विकास कार्यकारी सोसायटी अंतर्गत आर्थिक साक्षरता अभियान शुक्रवारी राबविण्यात आले.
त्यात जिल्हा बँक अंतर्गत सभासदांना शासनाच्या धोरणानुसार घरबांधणी, व्यवसाय, उद्योगधंदे यासाठी जिल्हा बँक अंतर्गत फायनान्स कर्ज बिनव्याजी म्हणजेच धोरणानुसार जो परतफेड करेल अशा लोकांसाठी केंद्र शासन तीन टक्के व महाराष्ट्र शासन यांच्याकडून तीन टक्के अशी रक्कम भरून लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. बँकेचे अमळनेर पारोळा येथील उपव्यवस्थापक संजय पाटील यांनी ही माहिती दिली.
मंगरूळ शाखेचे व्यवस्थापक अमोल पाटील, क्षेत्रीय अधिकारी एम.जी. पाटील, क्षेत्रीय अधिकारी बँकेचे कर्मचारी हिलाल पाटील उपस्थित होते.
विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन डॉ. सुनील अभिमन पाटील, शेतकी संघाचे संघाचे सचिव भरत सोनू पाटील, ग्रामपंचायत सदस्य पंडित चुडामण पाटील, विकास कार्यकारी सोसायटीचे सचिव शैलेश पाटील, सरपंच दिलीप भास्कर पाटील, उपसरपंच अशोक निंबा, दीपक पाटील व मान्यवर या उपस्थित होते.