शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मालकांच्या मदतीने पाळीव डुकरे मुंबईकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 22:45 IST

डुकरे मालकांच्या सहकार्याने १०० डुकरे काल शहरात पकडण्यात येऊन वाहनात टाकून ठाण्यांकडे रवाना करण्यात आली.

ठळक मुद्देअमळनेर : नागरिक आणि शेतकरी यांना मिळाला दिलासा, दोन पथकेे केली होती तयार

लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर : पाळीव डुकरांच्या उपद्रवाने शहरात कॉलनी वसाहतीलगत शेतशिवारात पिकांचा मोठ्या प्रमाणात फडशा पाडून शेतकऱ्यांची मका, ज्वारी आदी पिके उध्वस्त झाली असताना,पालिका अधिकारी, शेतकरी व डुकरे मालक यांच्या बैठकीतील निर्णयानुसार डुकरे मालकांच्या सहकार्याने १०० डुकरे काल शहरात पकडण्यात येऊन वाहनात टाकून ठाण्यांकडे रवाना करण्यात आली.यावेळी न. प. चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे व डुकरे मालक किशोर जाधव, विक्की जाधव व न. प. कर्मचारी उपस्थित होते. आर. के. नगर भागात ही पकडलेली डुकरे एकत्र करून वाहनाद्वारे रवाना करण्यात आली. मालक जाधव यांनी ही डुकरे मुंबईकडे विकली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी  तहसिलदार कार्यालयात मुख्याधिकारी आणि डुक्कर मालक व शेतकरी यांची बैठक झाली होती.यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, शेतकरी नेते शिवाजी पाटील यावेळी उपस्थित होते. शहरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार, पालिकाना निवेदन देऊन डुकरांच्या उपद्रवामुळे नुकसानभरपाईची मागणी केली होती. शहरातील पिंपळे रोड ढेकू रोड आणि गलवाडे रस्ता तांबेपुरा, मंगरूळ शिवार या भागात डुकरांनी उच्छाद मांडला होता. परिसरातील शेतकरीवर्ग अखेर कंटाळून तहसिलदार कार्यालय आवारात जमले होते.दरम्यान, यावर्षी दोन तीनवेळा पालिकेने डुक्करमालकांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र शहरातून एकही डुक्कर हद्दपार झालेले नव्हते. डुक्कर मालक दोन पथके तयार करून सोमवारपासून डुकरे पकडून बाहेरगावी पाठवण्यात येतील, असा निर्णय बैठकीत झाला होता. यानुसार काल डुकराची धरपकड करण्यात येऊन विल्हेवाट लावण्यात आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरagricultureशेती