शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:02 IST

भाव वाढलेल्या चांदीत घसरण

विजयकुमार सैतवालजळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या भाववाढीस अखेर लगाम बसू लागला आहे. यामुळेच चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४७ हजार रुपये प्रती किलोवरून ४६ हजार रुपये प्रती किलोवर आली. तसेच सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू असून चे ४०, ८०० ते ४१, १०० या दरम्यान खालीवर होत आहेतआंतरराष्ट्रीय पातळीवर इराण व अमेरिका यांच्यातील तणावाच्या स्थितीमुळे गेल्या काही दिवसात सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत गेली. मात्र त्यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर सोन्या-चांदीचे भाव स्थिर झाले. त्यानंतर आता चीनमध्ये कोरोनो व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची मागणी घटली आहे. सध्या लग्न सराई असली तरी चांदीची मागणी कमी होत आहे. सोबतच औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने मोठ्या व्यापारी व उद्योजकांनी चांदी खरेदीत हात आखडता घेतला आहे. त्यामुळे वरील दोन्ही कारणांनी मागणी कमी होत असल्यानेही चांदीचे भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.या सर्वांचा परिणाम होत असल्याने चांदीचे भाव १३ रोजी एकाच दिवसात एक हजार रुपयांनी घसरून ते ४७ हजार रुपये प्रती किलोवरून ४६ हजार रुपये प्रती किलोवर आले आहेत. १४ रोजीदेखील ते ४६ हजार रुपयांवर कायम होते. गेल्या काही दिवसात सोन्याने ४२ हजाराच्या पुढे झेप घेतली होती. मात्र जानेवारी अखेरपासून सोन्याच्या भाववाढीला ब्रेक लागला. तेव्हापासून त्यात २०० ते ३०० रुपये प्रती तोळ््याने चढ-उतार होत आहे. गेल्या आठवड्यात ५ फेब्रुवारी रोजी ४० हजार ८०० रुपयांवर असलेले सोने वाढत जाऊन १० रोजी ४१ हजार १५० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. दुसऱ्याच दिवशी ११ रोजी त्यात २५० रुपयांनी घसरण होऊन ते ४० हजार ९०० रुपयांवर आले. १३ रोजी पुन्हा हे भाव ४१ हजारावर तर १४ रोजी ४१ हजार १०० रुपयांवर पोहचले आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव