शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर काशी एक्स्प्रेसला दिव्यांग बांधवांचा डबा पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

जळगाव : काशी एक्सप्रेसमधील दिव्यांग बांधवांसाठी असलेला स्वतंत्र डबा रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यात अचानक बंद केल्यामुळे, दिव्यांग बांधवांची मोठ्या ...

जळगाव : काशी एक्सप्रेसमधील दिव्यांग बांधवांसाठी असलेला स्वतंत्र डबा रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यात अचानक बंद केल्यामुळे, दिव्यांग बांधवांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. यामुळे या प्र‌वाशांना इतर डब्यांमधुन प्रवास करावा लागत होता. याबाबत `लोकमत` ने दिव्यांग बांधवांच्या होत असलेल्या गैरसोयी बद्दल वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत रेल्वे प्रशासनाने पुन्हा काशी एक्सप्रेस मधुन दिव्यांग बांधवांचा डबा पुन्हा सुरू केला आहे.

रेल्वे प्रशासनातर्फे प्रत्येक प्रवासी रेल्वे गाडीला इंजिनाच्या बाजूला दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र एक डबा लावण्यात येत असतो. या डब्यातून फक्त दिव्यांग बांधवांनाच प्रवासाची मुभा आहे. तर इतर प्रवासी या डब्यातुन प्रवास करतांना आढळून आल्यास, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे रेल्वे पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाने एप्रिल महिन्यात कोरोनाचे कारण सांगून गाडी क्रमांक (०५०१७-१८) या काशी एक्स्प्रेसचा दिव्यांग व महिलांसाठी असलेला स्वतंत्र डबा अचानक बंद केला होता. या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांमधुन रेल्वेच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हा डबा बंद केल्यामुळे दिव्यांग बांधवांना जनरल डब्यातून खाली बसून प्रवास करावा होता. तसेच जर डब्यात गर्दी राहिली तर डब्यात प्रवेश करणेदेखील अवघड होत होते.

इन्फो :

अन् रेल्वे प्रशासनाने पुन्हा सुरू केला डबा

`लोकमत`ने हा डबा बंद केल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत वृत्त प्रकाशित करुन, रेल्वे प्रशासनाने लक्ष वेधले होते. तर भुसावळ विभागातील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील याबाबत आपण रेल्वे बोर्डाला याबाबत कळविणार होते. त्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने `लोकमत`च्या वृत्ताची दखल घेऊन अप आणि डाऊनच्या काशी एक्सप्रेसला पुन्हा दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या स्वतंत्र डबा जोडला आहे.

इन्फो :

रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात दिव्यांग बांधवांचा डबा बंद केल्याने, दिव्यांग बांधवांचे खुप हेळसांड झाली. त्यांनी मुळात हा डबा बंद करायलाच नको होता. दिव्यांग बांधवांच्या त्रासाबद्दल `लोकमत`ने वृत्त मांडल्यांवर रेल्वे प्रशासनान खऱ्या अर्थाने जागे आले. त्यामुळे `लोकमत`चे दिव्यांग बांधवांच्यावतीने आभार मानतो.

गणेश पाटील, अध्यक्ष, संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशिय संस्था, जळगाव.