जळगाव : महापालिका संकुलांतील मुदत संपलेल्या गाळेधारकांनी थकीत भाडे २४ डिसेंबरपर्यंत मनपाकडे भरणा करावे अन्यथा २६ डिसेंबरपासून कारवाई करण्याचा इशारा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी गुरुवार २० रोजी गाळेधारक प्रतिनिधींच्या बैठकीत दिला.महापालिकेच्या १८ व्यापारी संकुलांतील गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपलेली आहे. तेव्हापासून ते आजतागायत गाळेधारकांकडे गाळे भाडे थकीत आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी मनपा प्रशासनाने मे २०१८ पर्यंतचे गाळेभाडे व मालमत्ताचे बिले वितरितही केली आहेत. काही गाळेधारकांनी यावर हरकत कायम ठेवून, प्रशासनाने दिलेल्या बिलांच्या रकमेनुसार भरणा न करता, विशिष्ट रकमेचाच भरणा केला आहे.परंतु गाळेधारकांनी अद्याप पूर्ण भाडे व मालमत्ता कराची रक्कम भरलेली नाही. त्यात सुमारे सतराशे गाळेधारकांनी भरलेल्या रक्कमेतून केवळ २२ कोटीच वसुल झाले आहेत. या थकीत भाडे बाबत आयुक्त चंद्रकांत डांगे व गाळेधारक प्रतिनिधीचीं गुरुवारी दुपारी तीन वाजता आयुक्तांच्या दालनात बैठक झाली.महापालिकेची निवडणूक गेल्या आॅगस्ट महिन्यात झाली. निवडणुकीपूर्वी व त्यानंतर जुन्या व नव्या सत्ताधाऱ्यांकडून या विषयाकडे दुर्लक्ष झाले. मनपात पूर्वी खाविआची सत्ता होती. तर आता भाजपाकडे बहुमत आहेत. थकीत भाड्याचा आकडा आता ३०० कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते.४ महिने उलटूनही पैसे भरले नाहीमनपा निवडणूकीनंतर आयुक्तांनी गाळेधारकांच्या प्रतिनिधींना बोलावून गाळे भाडे भरण्याचे सांगितले होते. मात्र, चार महिने उलटूनही गाळेधारकांनी भाडे भरले नाही. त्यामुळे आयुक्तांनी गुरुवारी पुन्हा गाळेधारक प्रतिनिधींना बोलावून बैठक घेऊन थकीत गाळेभाडे भरण्याची सोमवार पर्यंत मुदत दिली.महापालिकेच्या तिजोरीत पैसा जमा व्हावा, हा माझा उद्देश आहे. कुणावरही कारवाई करण्याचा उद्देश नाही. प्रत्येकाने गाळेभाडे भरावे आणि कारवाईपासून सुटका करावी, अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल. -चंद्रकांत डांगे, आयुक्त मनपा.
जळगावातील व्यापारी संकुलांचे गाळेभाडे भरा, अन्यथा कारवाई अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 16:29 IST
महापालिका संकुलांतील मुदत संपलेल्या गाळेधारकांनी थकीत भाडे २४ डिसेंबरपर्यंत मनपाकडे भरणा करावे अन्यथा २६ डिसेंबरपासून कारवाई करण्याचा इशारा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी गुरुवार २० रोजी गाळेधारक प्रतिनिधींच्या बैठकीत दिला.
जळगावातील व्यापारी संकुलांचे गाळेभाडे भरा, अन्यथा कारवाई अटळ
ठळक मुद्देजळगाव महापालिकेत गाळेधारक प्रतिनिधींची झाली बैठकजळगाव मनपा आयुक्तांचा गाळेधारकांना अल्टीमेटमगाळेभाडे व मालमत्तांचे बिले वितरीत