शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव कृउबा सभापतींविरोधात संचालकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल- मनमानी कारभाराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 15:51 IST

सुरेशदादा राजकारणात सक्रीय: १३ संचालकांनी घेतली जिल्हाधिकाºयांची भेट

ठळक मुद्दे भाजपाचा सभापती हटणार१७ पैकी १३ संचालक विरोधातलकी टेलर होणार नवे सभापती

आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.२३- कृउबा समिती सभापती प्रकाश आनंदा नारखेडे यांच्याविरोधात कृउबाच्या १७ पैकी १३ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.आमदार सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यावर गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचे सत्र झाल्यानंतर सोमवारी सकाळी  हे १३ संचालक सुरेशदादांच्या बंगल्यावर जमले. तेथून महापौर ललित कोल्हे व माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकाºयांना याबाबत निवेदन देऊन अविश्वास ठराव पारित करण्यासाठी विश्ोष सभा बोलविण्याची मागणी केली. त्यानुसार विशेष सभा बोलविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे ७ सदस्य तर शिवसेनेचे ६ व लक्ष्मण गंगाराम पाटील (लकी टेलर) यांच्या गटाचे ५ सदस्य निवडून आले होते. त्यावेळी भाजपाचे प्रकाश नारखेडे हे सभापती तर शिवसेनेचे कैलास छगन चौधरी हे उपसभापती झाले होते. तर १८ पैकी एक संचालक भरत धनाजी पाटील यांचे नुकतेच निधन झाले आहे.सभापतींबाबत नाराजी  सभापती नारखेडे हे मनमानीपणे कारभार करतात. संचालकांना विश्वासात घेत नाहीत. एकतर्फी कामकाज करतात. बाजार समितीच्या सभांमध्ये बोलू देत नाहीत. तसेच मासिक सभा देखील नियमित घेत नाही. दोन-दोन महिने मासिक सभा घेत नाहीत, अशी संचालकांची तक्रार आहे. या मनमानीपणामुळे संचालकांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यानंतर अनेक घडामोडी होऊन लकी टेलर यांचा गट सेनेकडे आला.  आठ दिवसांपासून सभापतींवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र त्यास दिशा मिळत नव्हती. दोन दिवसांपूर्वी हे सर्व संचालक माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याकडे गेले. तेथे दोन दिवस संचालकांच्या बैठका झाल्या. सुरेशदादांनी सक्रिय सहभाग घेत प्रत्येक संचालकांचे मत जाणून घेतले. सभापती बदल करण्याचीच प्रत्येकाची मागणी असल्याने अविश्वास प्रस्ताव आणण्याचे निश्चित झाले.भाजपाचे तीन सदस्य फुटलेभाजपाचे मनोहर भास्कर पाटील, नितीन बाळकृष्ण बेहेडे यांच्यासह अन्य एक असे तीन संचालक रात्रीतून सेनेच्या गोटात दाखल झाले. लकी टेलर हे नूतन सभापती होणार असल्याचेही निश्चित करण्यात आले आहे. तीन वर्ष तेच या पदावर कायम राहतील. तर उपसभापती मात्र दरवर्षी बदलण्यात येतील, असे निश्चीत करण्यात आले असल्याची माहिती उपसभापती कैलास चौधरी यांनी दिली,महापौरांसह संचालक जिल्हाधिकाºयांकडेसोमवारी सकाळी १० वाजता सर्व संचालक सुरेशदादांच्या ७ शिवाजीनगर येथील निवासस्थानी जमले. तेथून महापौर ललित कोल्हे व माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्यासह दोन वाहनांमधून हे संचालक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विश्ोष सभा बोलविण्याची मागणी केली. त्यानुसार ३० आॅक्टोबर अथवा १ नोव्हेंबर रोजी कृउबाची विश्ोष सभा होणार आहे.