शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणावरून उंटावद येथे हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 15:51 IST

प्रेमप्रकरणावरून उंटावद येथे दोन गटात वाद वाढून हाणामारी झाली.

ठळक मुद्देदंगलीचा गुन्हा दाखलरस्परविरोधी फिर्यादी

यावल, जि.जळगाव : तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे गावात सांगून मुलीची बदनामी होत असल्याने मुलीचे वडील मुलाच्या वडिलांना समजावयास गेले. तेव्हा दोन गटात वाद वाढून हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. एका गटाकडील आठ जणांविरुद्ध, तर दुसऱ्या गटातील १५ जणांविरुद्ध मारहाणीसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत एका महिलेस दोन जण जखमी झाले. रविवारी सायंकाळी उंटावद, ता.यावल येथे ही घटना घडली.सूत्रांनुसार, तालुक्यातील उंटावद येथील समीर मेहेरबान तडवी हा गावातील तरूणीशी प्रेमसंबंध असल्याचे सांगून तरूणीच्या कुटुंबियांचंी बदनामी करीत होता. यावरून या तरूणीचे वडील समीरच्या घरी गेले. हा आपल्या मुलीची बदनामी करतो, असे त्याच्या वडिलांना सांगितले. त्याला समजावून सांगा, असे ते म्हणाले. तेव्हा तुमच्या मुलीलाच सांभाळा, आम्हाला कशाला दोष देता, असे सांगून मुलीच्या वडिलांंना शिवीगाळ केली. तसेच संशयित आरोपी समीर तडवी, रोशन मेहेरबान तडवी, गुलाब सायबू तडवी, कुर्बान झिपरू तडवी, छब्बू बाबू तडवी मेहेरबान झिपरू तडवी यांच्यासह दोन महिलांनी तरूणीच्या भावास व काकूस मारहाण केली. त्यातील रोषण तडवी याने हातातील फायटरने मारहाण केली. त्यात दोघे जखमी झाले.तर परस्परविरोधी फिर्याद रोषण तडवी याने दिली. त्यात म्हटले आहे की, माझा भाऊ समीर याने तरूणीशी प्रेमसंबध ठेवू नये या कारणावरून गावातील सुभाष पाटील, अरूण पाटील, नीलेश पाटील याच्यासह १५ जणांंनी घरी येवून दगडविटा मारून आई-वडील यांना मारहाण केली.दोन्ही गटाकडील २३ जणांविरूध्द येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पो. नि. अरूण धनवडे, हे. कॉ. संजय तायडे, सुनील तायडे, विकास सोनवणे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYawalयावल