पाचोरा : लग्न जुळवून देणाऱ्या दलालांमध्ये दलालीवरून हाणामारी झाल्याची घटना पाचोरा पोलीस स्टेशनजवळ घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शिरपूर येथील मुलाचे दलालांनी नाशिक येथील एका मुलीशी लग्न जुळवून देत लाखो रुपयांची दलाली घेतली. मुलीस दीड लाख रोख देत लग्नाची वेळ ठरली. मात्र, नवरी मुलगी मेकअपसाठी गेली तर ती परत आलीच नाही. बिचारा नवरदेव बोहल्यावर वाटच पाहत राहिला, अशी माहिती पाचोरा येथे दलालांमध्ये दलालीवरून झालेल्या हाणामारीत समोर आली.
यावेळी पाचोरा शहरातील महिला दलाल व कुऱ्हाड खु. येथील समाधान चव्हाण नामक दलाल यांच्यात झालेल्या वादवादीत समाधान चव्हाण हा मुलीकडील व महिला ही मुलाकडील दलाल होती. वधू मेकअपला गेल्याचे सांगून पळून गेली, असे दलाल महिलेचे म्हणणे होते. त्यामुळे दलाल समाधान यास महिलेने इतर साथीदारांकडून मारहाण करीत त्याची मोटारसायकल व मोबाइल रोख रक्कम हिसकावून तेथून पळ काढला. या घटनेने दलालांचे रॅकेट उघडकीस आले आहे.