शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विद्यार्थ्यांमध्ये फायटरने हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 12:26 IST

जळगाव येथे तंत्रनिकेतनसमोर वाद

ठळक मुद्दे दोन्ही गट पोलिसात

जळगाव : शासकीय औद्योगिक संस्था अर्थात आयटीआयच्या विद्यार्थ्यांमध्ये बुधवारी दुपारी एक वाजता महामार्गावरील तंत्र निकेतन समोर जोरदार हाणामारी झाली. यात एका गटाने फायटरचा वापर केला. भररस्त्यावर झालेला हा वाद नंतर रामानंद नगर पोलिसात पोहचला. तेथे गुन्हा दाखल करु नये यासाठी एका माजी नगरसेवकाने पुढाकार घेतला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिवराळ भाषा वापरली असता त्यावर एका विद्यार्थ्याने कशाला शिवीगाळ करतो, असे म्हटले असता तिघांना या विद्यार्थ्याला बदडून काढले. त्यात एका विद्यार्थ्याजवळ फायटर होते, त्यामुळे या मारहाणीत हा विद्यार्थी जखमी झाला. ज्या विद्यार्थ्याला मारहाण केली तो जलसंधारण विभागातील कर्मचाऱ्याचा मुलगा आहे तर अन्य तिघं जण साधारणच आहेत. दोन्ही गटातील विद्यार्थी तक्रार देण्यासाटी रामानंद नगर पोलिसात गेले होते.गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच एका माजी नगरसवेकाने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावण्यात आले. त्यानंतर शालेय जीवनाचा विचार करुन गुन्हा दाखल न करता समज देऊन प्रकरण मिटविण्यात आले.विद्यार्थ्यांमधील गॅँगवार घातकगेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांमध्येच मोठ्या प्रमाणात टोळी युध्द बघायला मिळत आहे. आयएमआर महाविद्यालयाचे मैदान असो कि शहरातील इतर महाविद्यालये येथे विद्यार्थ्यांचे गट तयार होऊन मोठ्या प्रमाणावर हाणामारी व दहशत माजविण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे या घटनांमध्ये फायटर, लाठ्याकाठ्या, चॉपर या सारख्या शस्त्रांचा वापर होऊ लागला आहे. उद्याचे भविष्य ज्यांच्यावर अवलंबून आहे, त्यांच्या हातात पुस्तकांऐवजी शस्त्र येऊ लागल्याने हा प्रकार घातक ठरु लागला आहे.