शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान क्षेत्रात चोपड्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकविणारे प्रा.डॉ.पी.एस. लोहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 22:55 IST

कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रकाश लोहार यांनी सेवेत असताना भारताबाहेर आणि भारतात विविध प्रांतात प्राणीशास्र विषयाच्या विविध परिषदांमध्ये त्यांच्या कामाचा ठसा उमटविला आहे.

ठळक मुद्देराष्टÑीय विज्ञान दिन विशेष प्राणीशास्र विषयाच्या विविध परिषदांमध्ये कामाचा ठसा

संजय सोनवणेचोपडा : कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रकाश लोहार हे प्राणीशास्र विभागात अनेक वर्षांपासून सेवेत आहेत. त्यांनी सेवेत असताना भारताबाहेर आणि भारतात विविध प्रांतात प्राणीशास्र विषयाच्या विविध परिषदांमध्ये त्यांच्या कामाचा ठसा उमटविला आहे.२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हापासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.२३ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील ऐतिहासिक मांडू नगरीत बालहक्क चळवळकर्ते व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते ३२व्या अखिल भारतीय प्राणीशास्त्रज्ञ काँग्रेस व पृथ्वीवरील सजीवांची शाश्वती या विषयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. या परिषदेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्राणीशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष तथा चोपडा येथील महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रकाश लोहार यांची देश-विदेशातील संशोधकांच्या कार्याचे सादरीकरणासाठी तयार झालेल्या समितीचे अध्यक्षस्थान त्यांना मिळाले. परिषदेत त्यांनी जनुकीय विश्लेषण व त्याचे प्राण्यांच्या वर्गीकरणातील महत्व या संशोधन कार्याची ओळख करून दिली.त्यांनी लिहिलेली १५ पुस्तके भारताच्या ५६ विद्यापीठात संदर्भग्रंथ म्हणून समाविष्ट आहेत. १५ युरोपीय व ५ आशिया खंडाच्या शैक्षणिक संस्थांना त्यांनी भेटी दिल्या आहेते.अशा उल्लेखनीय व सात्यतपूर्ण कार्यामुळे मांडू येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जर्मनीचे डॉ.उर्लीच बर्क, झेडएसआयचे अध्यक्ष डॉ.बी.एन.पांडे, सचिव डॉ.कमल जयस्वाल व परिषदेचे आयोजक डॉ.शैलेंद्र शर्मा यांच्या हस्ते डॉ.पी.एस.लोहार यांचा अखिल भारतीय स्तरावरील प्राणीशास्त्राचा ‘रिकग्निशन अवार्ड’ सन्मानपत्र व सुवर्णपदक देवून सन्मान करण्यात आला.

टॅग्स :scienceविज्ञानChopdaचोपडा