आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१२ : जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना पोषक आहार देणाºया दात्यांचा सत्कार अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे नुकताच करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेशदादा जैन होते. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नाभाभी जैन, सुमतीलाल टाटिया, यजुर्वेंद्र महाजन, डॉ. जयवंत मोरे, नीलिमा शेठीया, भारती पाटील, रेणू प्रसाद, दिलीप गांधी आदी होते.गेल्या तीन वर्षांपासून जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ विहान काळजी व आधार केंद्र आहे. ज्या द्वारे एचआयव्ही बाधित व्यक्ती व मुलांना मदत केली जाते. केंद्रात येणाºया एचआयव्ही बाधित बालकांना औषधासोबत पोषक आहार खूप महत्त्वाचा असतो. कार्यक्रमाचे औचित्य साधून या वेळी जळगाव जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित ४४ मुलांना पोषक आहार वाटप करण्यात आला. तसेच पोषक आहार वाटप करणाºया दात्यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यशस्वितेसाठी अपूर्वा वाणी, वंदना पवार, साधना बडगुजर, कल्पना जैन, संगीता सोनवणे, सरोज बाविस्कर, सुनीता तायडे, दीपक संदानशिव, राजश्री पगारिया यांनी परिश्रम घेतले.
जळगावात एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना मदत करणाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 19:13 IST
जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना पोषक आहार देणाºया दात्यांचा सत्कार अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे नुकताच करण्यात आला.
जळगावात एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना मदत करणाऱ्यांचा सत्कार
ठळक मुद्दे४४ मुलांना पोषक आहाराचे वाटपआहार वाटप करणाºया दात्यांचा सत्कारएचआयव्हीग्रस्त बालकांसाठी औषधांसोबत पोषक आहार गरजेचा