शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

हिंगणघाटच्या घटनेच्या पुनरावृत्तीची भीती... विद्यार्थिनी व तरुणी असुरक्षितच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:43 IST

एकतर्फी प्रेमातून छेडखानी

सुनील पाटीलजळगाव : एकतर्फी प्रेमातून हिंगणघाट, जि.वर्धा येथे प्राध्यापक तरुणीला पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्टÑात संताप व्यक्त होत आहे. हिंगणघाटमध्ये अशी घटना घडली असली तरी जळगावातदेखील एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनी, तरुणी व महिलांची छेडखानी होत असल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यात एकतर्फी प्रेम असो की छेडखानीच्या दहा घटनांची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे तर निर्भयाच्या पथकानेही शेकडोच्यावर तरुणांना समज देवून सोडले आहे.एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरुणीला पेट्रोल टाकून जाळल्याची घटना हिंगणघाट, जि.वर्धा येथे ३ फेब्रुवारी रोजी घडली. १० फेब्रुवारी रोजी तिची मृत्यूशी झुंज थांबली. या घटनेचा समाजमनातून सर्वत्र निषेध होत असून हल्लेखोराला तात्काळ कठोर शिक्षा मिळावी म्हणून राज्यभर आंदोलन सुरु आहेत. जळगाव शहरात अशी घटना घडली नसली तरी घडलेल्या घटनांवरुन हिंगणघाटची पुनरावृत्ती होते की? काय अशी भीती वाटू लागली आहे. शहरात असे काही ठिकाण आहेत की तेथे महिला, विद्यार्थिनी व तरुणींची नेहमीच छेड काढली जाते.टवाळखोरांना उरला नाही धाकशहरातील काही घटना पाहता तरुणी व विद्यार्थिनींची छेड काढल्यानंतरही आपले कोणीच काही करु शकत नाही ही भावना टवाळखोरांच्या मनात निर्माण झाल्याने त्यांची दिवसागणिक हिमत वाढत चालली आहे. रस्त्याने जाणारे नागरिक असा की घटनास्थळाजवळील व्यावसायिक आपल्या घरातला विषय नाही ना? मग जावू द्या म्हणून या घटनांकडे दुर्लक्ष करतात. नाजूक विषयात अशी मानसिकता नागरिकांची झाली होत असेल तर टवाळखोरांना ते फावणारच. सर्वाधिक घटना या जी.डी. नंदीनीबाई बेंडाळे महाविद्यालयाच्या परिसरात घडतात. तेथे शाळा सुरु होण्याच्या २० मिनिटे तर शाळा सुटण्याच्या २० मिनिटे आधी टवाळखोर थांबतात. पोलिसांचे पथक कधी असते तर कधी नसते, त्यामुळे तरुणी व विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे.हे आहेत छेडखानीचे टॉप टेन ठिकाण१) नंदीनीबाई बेंडाळे महाविद्यालय परिसर२) मू.जे.महाविद्यालय परिसर३) आयएमआर विधी महाविद्यालय परिसर४) मेहरुण तलाव परिसर५) फुले मार्केट परिसर६) प.न.लुंकड शाळा परिसर७) खान्देश सेंट्रल मॉल परिसर८) बस स्थानक परिसर९) काव्यरत्नावली चौक१०) पिंप्राळा बाजारका वाढते टवाळखोरांची हिंमत अन् नागरिकांची उदासिनतापीडित तरुणी भीतीपोटी कुटुंबाला सांगत नाहीआपल्या घरातील विषय नाही ना? ही नागरिकांची मानसिकतापोलिसांचा वावर अगदी कमी असतोअनेक ठिकाणी शिक्षक किंवा संस्थाचालकांची उदासिनताज्या व्यक्तीने पुढाकार घेतला, त्यालाच टवाळखोरांकडून मारहाण किंवा धमकीअशा आहेत एकतर्फी प्रेम व छेडखानीच्या घटना२६ डिसेंबर : रामेश्वर कॉलनीत महिलेची छेड काढली, गुन्हा दाखल२७ डिसेंबर : सुप्रीम कॉलनीत महिलेची छेड काढली, गुन्हा दाखल२८ डिसेंबर : एकतर्फी प्रेमातून तांबापुरात महिलेचे चुंबन घेण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल२९ डिसेंबर : परिचारिका तरुणीचा तिघांकडून छळ, जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल१६ जानेवारी : तरुणीची छेड काढणाऱ्याविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा१६ जानेवारी : एकतर्फी प्रेमातून जी.डी.बेंडाळे महाविद्यालयासमोर विद्यार्थिनीची छेड काढणाºया दोघांना चोपले२३ जानेवारी : एकतर्फी प्रेमातून बजरंग बोगद्याजवळ अल्पवयीन मुलीची छेड काढली१ फेब्रुवारी : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला छेडणाºयाविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा५ फेब्रुवारी : जी.डी.बेंडाळे महाविद्यालयासमोर विद्यार्थिनीची छेड काढणाºया दोघांना चोपले९ फेबु्रवारी : एकतर्फी प्रेमातून फुले मार्केट परिसरात तरुणीची छेड काढली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव