शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एफडीएचे पितळ पडले उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:07 IST

सुनील पाटीलजळगाव : गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शहरातील दिग्गज मानल्या जाणाऱ्या गुटखा किंगचा पर्दाफाश केला. जी कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करायला हवी, ती कारवाई खुद्द पोलीस अधीक्षकांनी केली. २० लाखाच्यावर किमतीचा गुटखा पकडून पोलीस अधीक्षकांनी अन्न व औषध प्रशासनाला उघडे पाडले आहे. या कारवाईनंतर काही ...

सुनील पाटीलजळगाव : गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शहरातील दिग्गज मानल्या जाणाऱ्या गुटखा किंगचा पर्दाफाश केला. जी कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करायला हवी, ती कारवाई खुद्द पोलीस अधीक्षकांनी केली. २० लाखाच्यावर किमतीचा गुटखा पकडून पोलीस अधीक्षकांनी अन्न व औषध प्रशासनाला उघडे पाडले आहे. या कारवाईनंतर काही समर्थकांनी पोलिसांना कारवाईचा अधिकारच नाही असा प्रचार सुरु केला. मुळात ज्यांना अधिकार आहे, त्यांनी तर काय बोंब पाडली. पोलिसांना अधिकार नाही तर मग कोर्टात का जात नाही. मुळात महाराष्टÑात गुटखा बंदी असतानाही यांच्याकडे गुटखा सापडतो, मग तो नियमात आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. गुजरात व मध्य प्रदेशातून कंटेनर भरुन गुटखा जिल्ह्यात आणला जातो. शहरातील सहा ठिकाण व नशिराबाद सातवे ठिकाण पोलीस अधीक्षकांनीच शोधून काढले. पोलिसांना हे ठिकाण माहिती नाहीत असाही प्रकार नाही, परंतु खुद्द पोलीस अधीक्षक कारवाईसाठी रस्त्यावर उतरतात. अन्य ठिकाणांची माहिती त्यांच्या अधिकाºयांना देतात, यावरुन खालची यंत्रणाही उघडी पडलेली आहे. वाहत्या गंगेत पोलिसांनीही हात धुवून घेतलेले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची कारवाई केल्याची ऐकिवात नाही. आजही काही ठिकाणी गुटखा खुलेआमपणे विक्री केला जात आहे. आता गुटखा विक्रीचा गुन्हा आयपीसीप्रमाणे नोंदविण्याचे निर्देशच न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता पोलिसांनाही कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे आता भविष्यात गुटख्यावर कोण व कशी कारवाई करते हे येणारा काळच ठरवले

टॅग्स :FDAएफडीएJalgaonजळगाव