शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पांढऱ्या सोन्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:20 IST

यंदा उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठत कापसाचा भाग कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देघोर निराशा, बाजा भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय झाला जुगारउत्तराच्या पावसाने हजेरी लावलीच नाहीएकरी दोन क्विंटलचाही उतारा नाहीचेकने दिल्यास वेगळा भाव, नगदीचा वेगळा भाव या करारावर चालतोय व्यवहार

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदा उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठत कापसाचा भाग कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी खरीप हंगामात मागील वर्षीचा बोध घेत पुन्हा शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली. प्रारंभी पावसाने चांगली सुरवात केली. मात्र शेवटी उत्तराच्या पावसाने हजेरी लावलीच नाही त्याचा फटका कापूस उत्पादक शेतकºयाला बसला. एकरी दोन क्विंटलचाही उतारा आला नाही. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शेतकºयाच्या आशेवर पूर्ण पाणी फिरले. कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे तसेच अस्मानी संकट आणि बोंडअळी व लाल्याच्या हल्ल्यामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले. अंतर्गत मशागतीसह आणि कापूस वेचणीच्या वाढत्या मजुरीमुळे शेतकरी आजच्या भावात कापूस विकण्याच्या मन:स्थितीत नाही.चार-पाच क्विंटलवाल्यांनी मिळेल त्या भावात दिवाळीत गरजेपोटी विकून टाकला. तेव्हाच काहींचा हंगाम संपल्यात जमा झाले, केवळ आता शेतात कापसाच्या काळ्या उभे असल्याचे चित्र आहे. त्यातच नोटा बंदीचा फटक्यात सावरा सावर करावी लागली होती. तीच स्थिती यंदाही कापसाला भाव मिळत नसल्याची आठवण शेतकºयांना झाली आहे. कमी लागवड असतानादेखील पाहिजे तेवढा भाव मिळत नाही. शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडले आहेत.काहींनी आगामी काळात भाव वाढल्यानंतर कापूस विक्री करण्यावर ठाम असले तरी कमी प्रमाणात कापूस झालेले शेतकरीच तो विकून मोकळे झाले. शासनाच्या हमी भावाचीही वाट पाहिली नाही.आता तर पूर्ण दीड महिन्यापासून भावात घसरण झाली आहे. सुरूवातीला सहा ते सात हजार प्रयत्न भाव होता. नंतर ५६०० जवळपास स्थिरावले. त्यातही चेकने दिल्यास वेगळा भाव, नगदीचा वेगळा भाव या करारावर व्यवहार चालत आहे आणि आता तर ५१००, ५२०० चे वर चढायला तयारच नसल्याने घरातच कापूस पडून आहे. सुरूवातीच्या तुलनेत भाव घसरले आहते. कापूस उत्पादक शेतकºयांना चिंता लागली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यातून शेतकºयांना सावरण्यासाठी शासनाने तत्काळ मदत केली तरच शेतकरी संकटातून बाहेर पडून सावरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

टॅग्स :cottonकापूसMuktainagarमुक्ताईनगर